जिद्द आणि चिकाटीचे यश! जांबूतचा तन्मय गाजरे आता ‘सहाय्यक राज्यकर आयुक्त’; सलग १२ व्या प्रयत्नांनंतर गाठले यशाचे शिखर
स्वराज्य टाईम्स वृत्तसेवा ‘प्रयत्नांती परमेश्वर’ या उक्तीचा प्रत्यय शिरूर तालुक्यातील जांबूत येथील तन्मय झुंबर गाजरे याने आणून दिला आहे. अत्यंत कठीण आणि प्रदीर्घ संघर्षातून तन्मयने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत देदीप्यमान यश संपादन केले असून, त्याची ‘वस्तू व सेवाकर’ (GST) विभागात सहाय्यक राज्यकर आयुक्त (वर्ग-१)पदी निवड झाली आहे. तब्बल १२ वेळा पूर्व परीक्षा, ८ वेळा…
