वाघोली (ता.हवेली) शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी आपल्या मतदारसंघातील समस्यांवर मार्ग काढण्यासाठी वाघोली येथे दिनांक २८ डिसेंबर रोजी जनता दरबाराचे आयोजन केले. यावेळी आमदार कटके यांनी वाघोली जरी माझी आई असली तरी शिक्रापूर माझी मावशी आहे, शिक्रापूर ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांचा पाठ करत सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी केले.
शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी ग्राम पंचायत सदस्य त्रीनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे, मोहनी युवराज मांढरे, उषा राऊत, शालिनी राऊत, माजी ग्राम पंचायत सदस्य सत्यवान भुजबळ, पत्रकार निलेश जगताप व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी आमदार माऊली कटके यांचा शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आमदार कटके यांच्या जनता दरबारात शिक्रापुर चे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी गावातील विकास कामांच्या बाबतीत निवेदन देत प्रामुख्याने शिक्रापूर आणि तळेगाव या रोडला जोडणारा जुना ऐतिहासिक पूल वाहतुकीस बंद केलेला असल्यामुळे वाहतुकीस खूप मोठा अडथळा निर्माण होत आहे. तळेगाव रोड येथील चव्हाण कॉम्प्लेक्स च्या पाठीमागून नकाशा मधील जुना रस्ता ३० फुटी आहे. तो पुढे वेळ नदीवर पूल केला तर तो शिक्रापूर स्मशानभूमी पर्यंत केल्यास बऱ्यापैकी वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी मदत होणार, शिक्रापूरची कचऱ्याची समस्या सोडवण्यासाठी शिक्रापूरला कुठल्याही प्रकारचे गायरान जागा नाही त्या संदर्भात वक्फ बोर्ड या ठिकाणी आणि लवार्डे पुनर्वसन गावठाण या ठिकाणी आधुनिक कचरा प्लांट साठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच शिक्रापूर येथील स्मशानभूमी बंधारा ते जुना पूल या ठिकाणी लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसाठी नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस बंधारा पूर्ण भरलेला असेल त्यावेळेस बोटिंगची व्यवस्था करण्यात यावी तसेच स्मशानभूमी परिसर सुशोभीकरण करण्यासाठी व नाना, नानी पार्क करण्यासाठी प्रयत्न करावे शिक्रापूर ची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत असल्याकारणाने जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी विद्यार्थी बसण्यासाठी वर्ग खोल्या कमी पडत आहे त्यासाठीही आपल्या प्रयत्न करावेत तसेच २०२१ साली कोरोना काळामध्ये ऑनलाईन मीटिंग द्वारे नगरपरिषदेचा व इलेक्ट्रिक विद्युत दाहिनीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यासाठीही पाठपुरावा करण्याची मागणी केली त्याचबरोबर वेळ नदीला तसेच सर्व कॅनॉलला चासकमान धरणाचे पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी आमदार कटके यांनी कुठल्याही परिस्थितीत आपल्या वेळ नदीला व कॅनॉलला चासकमान धरणाचे पाणी कमी पडू देणार नाही असे आश्वासन दिले.
वाघोली जरी माझी आई असली तरी शिक्रापूर माझी मावशी आहे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारची काळजी करू नका आपली कामे नक्कीच मार्गी लावणार असून शिक्रापूर गावच्या सर्वांगीण व नेत्रदीपक विकासासाठी प्रयत्न करणार – आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी ग्राम पंचायतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने ज्या मागण्या करण्यात आल्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन देत गावच्या सर्वांगीण व नेत्रदीपक विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत वाघोली ही आई असली तरी शिक्रापूर ही माऊशी असल्याचे सांगत गावचा मोठा गौरव केला असून त्यांच्या माध्यमातून गावचा विकास मोठ्या प्रमाणावर करणार आहे. – आदर्श सरपंच रमेश गडदे