उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील जन सन्मान यात्रेची जय्यत तय्यारी

Swarajyatimesnews

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे विधानसभेच्या पार्श्याभूमीवर अनेकांचे लक्ष तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला 

कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह पक्ष यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती शिरूर तालुकाध्यक्ष रवींद्र काळे व दादा पाटील फराटे यांनी दिली.

सन्मान जनतेचा,मार्ग लोककल्याणाचा हा विचार मंत्र घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा शिरूर तालुक्यात सणसवाडी येथील कृष्णलीला गार्डन येथे होणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार हे मार्गदर्शन करणार असून त्यांचा स्पष्टवक्तेपणा सर्वांनाच परिचित असून ते उद्या काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Swarajyatimesnews
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जन सन्मान यात्रा

कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी दादा पाटील फराटे, राजेंद्र कोरेकर, सुधीर फराटे, शशिकांत दसगुडे, नवनाथ हरगुडे , कुंडलिक शितोळे, संतोष दौंडकर, राजेंद्र गव्हाणे, अमित गव्हाणे, व इतर मान्यवर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

अजित पवार यांची सभा विधानसभेसाठी लक्षवेधी –राज्यासह पुणे जिल्ह्यात लक्षवेधी ठरलेल्या शिरूर लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिरूर हवेली विधानसभा मतदार संघात आता राजकीय आखाडा रंगणार असून विधान सभेची जागा व उमेदवारी गुलदस्त्यात असून दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्टवक्तेपणा व कामाचा झपाटा यामुळे सर्वांनाच अजित पवार यांचे आकर्षण असून आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही सभा मात्र लक्षवेधी व शिरूर हवेली विधानसभेच्या आगामी निवडणुकीतील राजकीय आखाड्याची रंगीत तालीम ठरणार की काय ?? याची उत्सुकता दिसून येत आहे.

घोडगंगा साखर कारखान्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका नेमकी काय ?? शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना हा शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनु आहे. तालुक्याचे नाक म्हणून याकडे पाहिले जाते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यांनी साखर कारखाण्याबाबत स्पष्ट व शेतकरी हिताची व सहकाराला चालना देणारी भूमिका घेतात काय ? याकडे सभासद व शेतकऱ्यांचे लक्ष लागले असून  घोडगंगा सहकारी साखर अडचणीत आला आहे. त्याला उभारी देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका मोलाची असून शेतकऱ्यांच्या चुलिशी व जीवनाशी संबधित कारखान्याला मदतीचा हात देणे हे तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असून याचा सहकार व राजकीय क्षेत्रात दूरगामी परिणाम ठरणार असल्याची चर्चा रंगत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!