रांजणगाव गणपती परिसरात कार्यकर्त्यांचा जल्लोष!रांजणगाव गणपती
स्वराज्य टाइम्स वृत्तसेवा
भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा उत्तर अंतर्गत शिरूर बेट मंडलच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून, यामध्ये भाजपचे सक्रीय कार्यकर्ते विलास रावसाहेब बत्ते यांची सरचिटणीस (महामंत्री) पदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे बेट मंडल परिसरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.रांजणगाव गणपती येथे झालेल्या या निवडीच्या प्रसंगी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा सरचिटणीस श्रीकृष्ण देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप सातव, शिरूर बेट मंडल अध्यक्ष संयोगिता पलांडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.
पक्ष संघटन होणार अधिक मजबूतविलास बत्ते हे गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अग्रगण्य आहेत. विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचा दांडगा जनसंपर्क असून, त्यांच्या संघटन कौशल्याचा फायदा भाजपला आगामी काळात निश्चितच होईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाने व्यक्त केला आहे. त्यांच्या निवडीमुळे रांजणगाव गणपती आणि बेट मंडल परिसरातील तरुण कार्यकर्त्यांना मोठी ऊर्जा मिळाली आहे.या मान्यवरांची लाभली उपस्थितीयावेळी शिरूर-आंबेगाव माजी तालुकाध्यक्ष सतीश पाचंगे, उद्योजक दत्तात्रय पाचुंदकर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नानासाहेब लांडे, विद्यार्थी आघाडीचे माजी अध्यक्ष हर्षद जाधव, उद्योजक सचिन कुटे, बजरंग दल अध्यक्ष सोमनाथ बांदल, उद्योजक विकास फंड, शैलेश पाचुंदकर, अजित इटनर तसेच केशव लांडे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
“पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. येणाऱ्या काळात पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन.”— विलास बत्ते (नवनियुक्त सरचिटणीस, भाजप शिरूर बेट मंडल)
