पाबळ-केंदूर गटात राष्ट्रवादीची घोडदौड; प्रफुल्ल शिवले अन् वंदना पवार , सुचित्रा थिटे यांची प्रचारात मोठी आघाडी

Swarajyatimesnews

प्रकाश पवारांचा ३० वर्षांचा अनुभव आणि सुचित्रा थिटेंना मिळणारी तरुणाईची साथ ठरतेय कळीची; शिवलेंच्या ‘माणुसकी’च्या कार्यावर मतदारांचे शिक्कामोर्तब.

पाबळ (ता. शिरूर)  जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने पाबळ-केंदूर गटात राजकीय वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसने प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषद उमेदवार प्रफुल्ल शिवले, पंचायत समिती उमेदवार वंदना पवार आणि सुचित्रा थिटे यांच्या प्रचाराला जनसामान्यांचा, विशेषतः तरुणाईचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. प्रकाश पवार यांचा दांडगा जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांची भक्कम फळी तसेच प्रफुल शिवले यांच्यासारखा प्रभावी चेहरा कोरोना  संकटकाळात सर्वसामान्यांची केलेली सेवा, तीर्थ यात्रा, मित्र सहकारी यांचे मित्र जाळे यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड झाले आहे.

प्रफुल्ल शिवले: ‘संकट काळातील श्रावणबाळ’: प्रफुल्ल शिवले यांची ओळख केवळ एक उमेदवार म्हणून नाही, तर ‘दिलेला शब्द पाळणारा शेतकरी कुटुंबातील माणूस’ अशी आहे. कोरोनाच्या भीषण संकटात जेव्हा जग थांबले होते, तेव्हा शिवले यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता गरजूंच्या घरापर्यंत अन्नधान्य आणि औषधोपचार पोहोचवले. हजारो ज्येष्ठांना तीर्थयात्रा घडवून त्यांची सेवा केल्यामुळे त्यांना जनमानसात ‘श्रावणबाळ’ ही पदवी मिळाली आहे. वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी त्यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा त्यांच्या सांस्कृतिक निष्ठेची साक्ष देतो.

प्रकाश पवारांचा दांडगा जनसंपर्क यासह सामाजिक व राजकीय ‘अनुभव’ आणि विकासाचे व्हिजन : या निवडणुकीत प्रकाश पवार यांची ३० वर्षांची राजकीय तपश्चर्या राष्ट्रवादीसाठी सर्वात मोठी ताकद ठरत आहे. पाबळ येथे उभारलेले बाजार समितीचे भव्य मार्केट, शेतकरी योजना आणि उद्योगधंद्यांसाठी तरुणांना दिलेले मार्गदर्शन यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी उभारी मिळाली आहे. वाड्या-वस्त्यांवर प्रकाश पवार यांनी जपलेले जिव्हाळ्याचे नाते प्रत्येक कुटुंबाला पक्षाशी जोडून ठेवत आहे.

सुचित्रा थिटेंना तरुणाईची साथ’; वंदना पवारांचा महिलांवर प्रभाव : केंदूर गणात सुचित्रा थिटे यांच्या प्रचारात तरुणांचा मोठा सहभाग दिसत आहे. सुशिक्षित आणि कामाची ओढ असलेल्या थिटे यांच्या रूपाने नवीन नेतृत्व मिळत असल्याने युवा वर्ग मोठ्या संख्येने त्यांच्याशी जोडला जात आहे. तर दुसरीकडे, वंदना पवार यांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेले उपक्रम आणि त्यांची कार्यतत्परता यामुळे महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठी आपुलकी आहे.प्रकाश पवार यांचे आजोबा,वडील व तरुण अशा तीन पिढ्यांशी जिव्हाळ्याचे नाते यामुळे सर्व वयोगट असणारे मतदार आणि प्रफुल शिवलेंचा श्रावणबाळ म्हणून असणारा चेहरा यामुळे सर्व बाजू जमेच्या ठरल्याने सध्या केंद्र पाबळ जिल्हा परिषद गटामध्ये त्यांचा प्रचाराचा व मतदारांपर्यंत पोहोचण्याचा झंजावात मोठा आहे.

विकासाची माणुसकी’ घराघरांत पोहोचली : रस्ते, शिक्षण, वीज आणि पाणी या मूलभूत सुविधांसोबतच बेरोजगार तरुणांना उद्योगाची दिशा दाखवण्याचे कार्य शिवले यांनी केले आहे. “आम्ही केवळ निवडणुकांपुरते आश्वासन देत नाही, तर मागील तीन दशकांपासून जनतेच्या सुख-दुःखात भागीदार आहोत. हीच ‘विकासाची नेकी’ आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल,” असा ठाम विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला आहे.

 “माजी सरपंच प्रफुल्ल शिवले यांच्या कार्याची आपुलकी, प्रकाश पवारांचा अनुभव व मतदारांच्या तीन पिढ्यांची असलेले नाते , वंदना पवार यांचा महिला व तरुणींची असलेला दांडगा जनसंपर्क केलेली विधायक कामे आणि सुचित्रा थिटेंना मिळणारी तरुणाईची साथ, हे त्रिकूट पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटात पारडे जड ठरत आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!