केसनंद-कोरेगाव मूळ गटात राष्ट्रवादीचा झंझावात; सुरेखा रमेश हरगुडे यांचा सोसायट्या आणि वाड्या-वस्त्यांवर ‘थेट संवाद’!

Swarajyatimesnews

मूलभूत सुविधांच्या कायमस्वरूपी निवारासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध; मतदारांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद

केसनंद-कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात निवडणुकीचे वातावरण पूर्णपणे तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे. विविध सोसायट्या, वाड्या आणि वस्त्यांवर नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांनी मूलभूत सुविधांचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या ‘लोकसंवाद’ दौऱ्याला मतदारांकडून मिळणारा वाढता पाठिंबा पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या गटात अधिक भक्कम होताना दिसत आहे.

विकासाचा रथ’ पुढे नेण्यासाठी जनतेची साथ – सुरेखा रमेश हरगुडे प्रचारादरम्यान बोलताना सुरेखा हरगुडे यांनी स्पष्ट केले की, केसनंद-कोरेगाव मूळ गटाच्या प्रगतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे कटिबद्ध आहे. “रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी निवारणासाठी आम्ही ठोस पावले उचलत आहोत. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदारांनी विकासाचा हा रथ असाच पुढे नेण्यास साथ द्यावी,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

समस्या जाणून घेऊन उपाययोजनांवर भर : या प्रचार दौऱ्यात उमेदवारांनी केवळ आश्वासने न देता, नागरिकांच्या नेमक्या अपेक्षा, सूचना आणि समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी, स्वच्छता आणि सुरक्षा यांसारख्या कळीच्या मुद्द्यांवर सुरेखा हरगुडे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरोग्य आणि वाहतुकीच्या मूलभूत सुविधांवर वेळबद्ध काम करणे हीच आपली प्राथमिकता असल्याचे त्यांनी नमूद केले.

युवा नेतृत्वाचाही प्रचारात सक्रिय सहभाग : सुरेखा रमेश हरगुडे यांच्यासोबतच पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद चंद्रकांत हरगुडे (केसनंद-वाडेबोल्हाई गण) आणि कृषिराज दत्तात्रेय चौधरी (हवेली कोरेगाव मूळ गण) हे देखील मैदानात उतरले आहेत. नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन त्यावर दीर्घकालीन उपाय शोधणे हेच आमचे ध्येय असल्याचे प्रमोद हरगुडे यांनी सांगितले. तर, विकास हा लोकांशी साधलेल्या संवादातून आणि लोकसहभागातूनच घडतो, असा विश्वास कृषिराज चौधरी यांनी व्यक्त केला.

एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तिन्ही उमेदवारांनी मतदारांशी थेट नाळ जोडल्याने केसनंद-कोरेगाव मूळ गटात परिवर्तनाचे वारे वाहू लागले असून, मतदारांचा कल या ‘विकासवादी’ नेतृत्वाकडे झुकत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!