किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही – प्रदिप विद्याधर कंद
पेरणे (ता. हवेली) , २ नोव्हेंबर २०२५ – लोणीकंद-पेरणे परिसरातील नागरिकांसाठी आयोजित काशी विश्वनाथ आणि अयोध्या यात्रेसंदर्भात गोल्डन पॅलेस येथे भरलेल्या संवाद मेळाव्यात किरण साकोरे यांना जनतेचे भक्कम पाठिंबा मिळाला. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात विकासाचे राजकारण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम दिसून आला.
पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद यांनी किरण साकोरे यांना भक्कम पाठिंबा देताना स्पष्ट शब्दात म्हटले, “किरण, तू काळजी करू नकोस. तुझी राजकीय स्वप्ने पूर्ण झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. तू सामान्य कुटुंबातून आलेला असूनही तुझ्याकडे मोठे कर्तृत्व आहे. जनतेच्या सेवेचा तुझ्याकडे खरा हेतू आहे.”
विकासाचे राजकारण हे किरण साकोरे यांच्या राजकीय जीवनाचा पाया आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातून आलेल्या साकोरे यांनी स्वकष्टाने व्यवसाय उभारून अनेक युवकांना रोजगार निर्माण केला आहे. प्रदीप कंद यांनी यावर भर देताना म्हटले, “राजकारणात गावाचा आकार नसतो, कर्तृत्व पाहिले जाते. किरण यांनी आपल्या कामाने हे सिद्ध केले आहे.”या यात्रेचे नियोजन उत्कृष्ट केले असून भाविकांसाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. भाविकांना देवाचे दर्शन घडविण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी काशी विश्वेश्वर मंदिर व अयोध्या येथे प्रभू श्री राम मंदिर येथे ट्रेन देण्याचे आश्वासन प्रदीप कंद यांनी दिले. याशिवाय यात्रेदरम्यान नागपूर चैत्यभूमी आणि तुळजापूर येथील दर्शनाची सोय करण्यात आली आहे. अशी ग्वाही माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद यांनी दिली.

हा मेळावा आमदार माऊली कटके, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप विद्याधर कंद, भाजपचे व कुस्तीगीर संघाचे संदीप भोंडवे, यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप, जिल्हा परिषद सदस्य शंकर भुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.


यावेळी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, माजी हवेली पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी कापरे , पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील विविध गावचे आजी माजी सरपंच, ग्राम पंचायत सदस्य, विविध पदाधिकारी, माता भगिनी, तरुणांच्या सहकार्याने व थोर मोठ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने पेरणे लोणीकंद मार्गदर्शनाखाली पार पडला. पेरणे लोणीकंद जिल्हा परिषद गटातील आजी माजी पदाधिकारी, विविध मान्यवर, ज्येष्ठ मार्गदर्शक, माता भगिनी व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काशी विश्वनाथ आणि अयोध्या यात्रेद्वारे भाविकांना अध्यात्मिक समाधान मिळेल यावर या मेळाव्यात भर देण्यात आला. किरण साकोरे यांनी सांगितले, “आमच्या परिसरातील भाविकांना काशी विश्वनाथ आणि अयोध्या येथील रामलल्ला दर्शनाचा आनंद मिळावा यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. यात्रेतून समाजात एकात्मतेचा संदेश पोहचवत आहे.”
ऋतुजा साकोरे यांनी कुटुंबाचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. किरण साकोरे यांनी आपल्या आई-वडिलांचा समाजसेवेचा वारसा पुढे चालविला आहे. बैलगाडा घाट, धर्मशाळा, रस्ते, मंदिरे आणि वारकऱ्यांची सेवा यांतून त्यांनी समाजाची सेवा सातत्याने केली आहे.

काशी-अयोध्या यात्रेतून किरण साकोरे यांनी अध्यात्म आणि विकास यांचा यशस्वी संगम साधला आहे. प्रदीप विद्याधर कंद यांच्या मार्गदर्शनामुळे आणि जनतेच्या अपार पाठिंब्यामुळे साकोरे यांच्या राजकीय वाटचालीला नवीन बळ आले आहे. ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वावर चालत, विकासाचे राजकारण करणारे साकोरे हे भविष्यातील महत्त्वाचे नेते म्हणून उदयास येत आहेत.
