वाघोली करांच्या समस्या अनेक पण त्यांना सोडविणारा हक्काचा उपाय एक – अनिल सातव पाटील

Swarajyatimesnews

वाघोलीतील पथदिवे, ड्रेनेज, आदी समस्या तत्काळ मार्गी लावल्याने नागरिकांमध्ये समाधान 

वाघोली (ता.हवेली) जनहिताच्या व्यापक व सर्वसमावेशक लोककल्याणकारी कामांचा उंचावणारा आलेख आणि समस्या सोडवण्यासाठी नागरिकांचा वाढता ओघ हीच जनसेवेची पावती असून समाजकारण करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात आनंदात व सुख आणण्यासाठी प्रयत्न करणारा हक्काचा आपला माणूस, निम्म्या रात्रीला मदतीला धावणारा मनातला जन्सवक अशी जनमानसात प्रतिमा निर्माण करणारे तसेच वाघोली करांच्या समस्या अनेक पण त्यांना सोडविणारा हक्काचा विश्वासू उपाय म्हणजे भाजपा युवा मा.हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील यांचे नागरिकांच्या मनात येत असते. Wagholi (Tal. Haveli) The rising graph of comprehensive and comprehensive public welfare works of public interest and the increasing influx of citizens to solve the problems are the acknowledgement of public service. While working in the society, he creates an image in the public mind as a man of rights who tries to bring happiness and joy to the lives of ordinary citizens, a public servant who runs to help in the middle of the night, and also creates a trustworthy solution to the problems of Wagholi, but there are many problems of taxes, and the BJP Youth Hon. Haveli Taluka President Anil Satav Patil comes to the minds of the citizens.

भाजप युवा मोर्चा मा. हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील वाघोलीतील विविध भागातील नागरिकांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तात्काळ समस्या सोडवल्या जात असल्याने नागरिकांचा देखील अनिल सातव पाटील यांचेकडे सोसायटी व सर्वसामान्य नागरिकांचा ओघ वाढलेला दिसून येत आहे.  

  वाघोली-केसनंद रोडवरील दुबेनगर येथील मुख्य रस्त्यावर खड्डे पडल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. याबाबत येथील राशीवाशांनी अनिल सातव यांचेकडे रस्ता दुरुस्ती करण्याची मागणी करताच जेसीबीच्या सहायाने मुरूम टाकून खड्डे बुजवून रस्ता दुरुस्त करण्यात आला. त्याबरोबर उबाळे नगर येथील एक ते वीस लेन मधील पथदिवे सुरु करण्यात आले आहेत. उर्वरित लेनमधील सुद्धा लवकर काम पूर्ण करण्यात येणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच फुलमाळा रोडवरील छत्रपती चौक ते मॅनहॅटन- पार्कलेन- गगन अधिरा सोसायटी समोरील रोड, छत्रपती चौक, प्रभुरामनगर, गुलमोहर ग्रीन येथे रस्त्यांवर अनेक दिवसांपासून खड्डे पडले होते. त्यामुळे गैरसोय होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक, सोसायटी कमेटी, चेअरमन यांनी सातव यांचेकडे केली होती. नागरिकांच्या तक्रारीची लगेच दखल घेऊन खड्डे बुजवण्यात आले.

संत तुकाराम नगर येथे ड्रेनेजचे चेंबर फुटल्याने दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात शिरले होते. येथील रहिवाशांनी सातव यांचेशी संपर्क करून समस्या सोडवण्याची मागणी केली. सातव यांनी नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेता सदर ठिकाणी पाहणी करून सेफ्टी टॅन्क मदतीने पाण्याचा उपसा केला. त्यानंतर मनपाकडे पाठपुरावा करून नव्याने चेंबर टाकून प्रश्न मार्गी लावला.   

तात्काळ नागरी समस्या मार्गी लावणारा तरुण लोकप्रतिनिधी म्हणून अनिल सातव पाटील यांची ओळख निर्माण झाली आहे. साहजिकच नागरिक सातव पाटील यांच्या कार्यालयाकडे विविध प्रश्न सोडवण्यासाठी धाव घेत असल्याचे दिसून येते. – गौरव सातव पाटील , सामाजिक कार्यकर्ते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!