Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
“वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या निषेधापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत फडणवीस यांची प्रेरणादायी यशोगाथा”
इंदिरा गांधींनी आणीबाणीत वडिलांना तुरुंगात टाकले म्हणून मला त्यांच्या नावाच्या शाळेत शिकायचे नाही असे वयाच्या सहाव्या वर्षी सांगत शाळा बदलणारे, वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि दोन वेळा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांची उत्तुंग वाटचाल महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेते, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव आज प्रत्येकाच्या…
दौंडमध्ये एक बिबट्या पिंजऱ्यात अडकला तर दुसऱ्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण दौंड तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भीमा नदीचा पट्टा आणि पुणे-सोलापूर महामार्गालगतच्या गावांमध्ये बिबट्यांचे वास्तव दिवसेंदिवस वाढत आहे. रविवारी (दि. १) पहाटे यवत रेल्वे स्टेशनजवळ एका बिबट्याला रेल्वेची धडक बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना वन्यजीवांसाठी चिंताजनक असून, शेतकरी आणि शेतमजूर भयभीत झाले आहेत. दौंड तालुक्यातील पाटस, वरवंड,…
भयंकर! घरासमोर विष्ठा केल्याच्या वादात नऊ महिन्याच्या मुलावर कुऱ्हाडीने वार
शेजाऱ्यांमधील वाद विकोपाला, आरोपी फरार बेलापूरमध्ये एका ९ महिन्याच्या बाळावर कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बाळावर वार केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा कसून शोध घेतला जात आहे. ९ महिन्यांचा चिमुकला गंभीर जखमी असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही…
बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाई मिळणार…
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांपर्यंत त्याने हल्ले केल्याच्या बातम्या सतत येतात. बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येतात. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, वस्त्यांवरील भटकी कुत्री यांच्या शिकारी करतात.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील…
पुणे – तहसीलदारांकडेच मागितली दहा लाखांची खंडणी; बोगस रेशनिंग कार्ड प्रकरण
पुणे जिल्ह्यात एक धक्कादायक व खळबळ जनक घटना उघडकीस आली असून बोगस रेशनिंग कार्ड दिल्या प्रकरणी खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली आहे.खंडणी मागणारे आणि रेशनिंग कार्ड देणारे अशा दोघांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी असा तक्रारी अर्ज तहसीलदार ज्योती देवरे यांनी खेड पोलिस ठाण्यात दिला आहे….
पाहुनी समाधीचा सोहळा | दाटला इंद्रायणीचा गळा.. माऊलींच्या ७२८व्या संजीवन समाधी सोहळ्याचा भक्तिमय उत्सव
ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम… असा संजीवन सोहळ्याच्या कीर्तनातील जयघोष… दुपारचे १२ वाजले आणि घंटानाद.. समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी… संत नामदेव महाराज व माउलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे… अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२८वा संजीवन समाधी सोहळा ‘माउली – माउलीं’च्या जयघोषात पार पडला. संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष नयनांनी अनुभवत…
विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी सदैव कटिबद्ध – मनीषा गडदे
कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना प्रश्न संचाचे वाटप शिक्रापूर (प्रतिनिधी ) राष्ट्राची खरी संपत्ती स्वाभिमानी व सुसंस्कृत नागरिक असून समृद्ध भारत घडवायचा असेल शिक्षण व संस्कार दर्जेदार व्हायला हवेत यासाठी समाजाने पुढाकार घ्यायला हवा.कर्तव्य फाउंडेशनच्या वतीने विद्यार्थ्यांचे सुसंस्कृत व उज्वल भविष्य घडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन कर्तव्य फाऊंडेशन या समाजसेवी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा गडदे…
धक्कादायक! खाजगी क्लासच्या शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन ग्रामस्थांनी चोप देत दिले पोलिसांच्या ताब्यात
चाकण जवळील खराबवाडी येथील शिक्षकाचा प्रताप चाकणलगतच्या खराबवाडी येथील खाजगी कोचिंग क्लासेस घेणाऱ्या सुशील पुंडलिकराव कुन्हेकर या शिक्षकाने स्वतःच्या खासगी शिकवणीत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थिनीशी व तिच्या दोन अल्पवयीन मैत्रिणींशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने संतप्त पालक व ग्रामस्थांनी संबंधित शिक्षाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.(After the shocking incident of…
ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, विस्तार अधिकाऱ्याला धु..धु.. धुतलं , तोंडाला फासले काळे
राज्यात एक खळबळ जनक घटना उघडकीस आली असून ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला त्याच्या कार्यालयात जावून शिवसैनिकांनी जब विचारला असता आधी त्याने या प्रश्नी उडवा उडवीची उत्तर दिली.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी चोप देत महिलेने तोंडाला काळे फासले. हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत झाला. त्यानंतर पंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली.(A sensational…
फुलगावमध्ये गाईच्या दोरीचा फास बसल्याने आठ वर्षीय चिमुकल्याचा हृदयद्रावक अंत
फुलगाव (ता.हवेली) अंगणात खेळत असणाऱ्या आठ वर्षाच्या मुलाच्या हातात गाईला बांधलेली दोरी अडकली. याचवेळी गाई पळत सुटल्याने चिमुकला ओढत नेल्याने डोक्याला जोरदार मार लागल्याने व गळ्याला फस बसल्याने गंभीर जखमी होवून चिमुकल्याचा हृदयद्रावक मृत्यू झाला. सदरची घटना पुण्याच्या हवेली तालुक्यातील फुलगाव येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.(An eight-year-old boy playing in the courtyard of…
