
Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.

डिंग्रजवाडी शाळेतील विद्यार्थ्याची जवाहर नवोदय विद्यालयामध्ये निवड
डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी कु. ओंकार चंद्रकांत बांगर याची जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत निवड झाली आहे. शाळेचे मुख्याध्यापक सूर्यकांत काळे यांनी ही माहिती दिली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत ओंकारने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून, त्यामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. वर्गशिक्षिका अनुराधा विजय…

“छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त शंभू भक्तांना पृथ्वी ग्राफिक्सकडून ताक व पाण्याचे वाटप”
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) स्वराज्य रक्षक धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त, वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधीस्थळी महाराष्ट्रभरातून आलेल्या शंभू भक्तांसाठी कोरेगाव भीमा येथील पृथ्वी ग्राफिक्स डिजिटल फ्लेक्स व प्रिंटिंगतर्फे तसेच संजय सुभाषचंद्र शिवले आणि कौस्तुभ दशरथ होळकर यांच्या वतीने हजार पाण्याच्या बाटल्या आणि ताकाचे वाटप करण्यात आले. भर दुपारच्या उन्हात…

महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून श्री क्षेत्र वढू बुद्रुक करणार विकसित – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३६व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित धर्मसभेत वढू बुद्रुक हे महाराष्ट्राचे तीर्थस्थळ म्हणून विकसित करण्याची घोषणा केली आहे. तसेच, मृत्यूंजय अमावस्येच्या दिवशी, ज्यादिवशी छत्रपती संभाजी महाराज वीरगतीला प्राप्त झाले, त्या निमित्ताने पुणे जिल्ह्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले….

पत्रकार विजय लोखंडे यांचा राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने गौरव
पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची ध्येय एज्युकेशन फाउंडेशनने घेतली दखल ‘Ideal Journalist’ award याप्रसंगी हडपसरचे आमदार चेतन तुपे,फाउंडेशनचे संस्थापक सुदाम शेंडगे,राज्य मार्गदर्शक सोमनाथ शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे,योजना संचालनालयचे संचालक डॉ.महेश पालकर,पालिकेच्या सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे,ध्येय प्रकाशन अकॅडमीच्या संस्थापिका अर्चना शेंडगे,सचिव सोनाली गाडे,राज्यप्रमुख संदीप पाटील,सारिका शिंदे,उर्मिला पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. विजय लोखंडे यांनी गेल्या १८…

पुणे जिल्हा परिषदेकडून केंदूर ग्रामपंचायतीचा सन्मान; क्षयरोगमुक्त गावाचा बहुमान
केंद्रूर (ता. शिरूर) , २६ मार्च —पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने केंदूर ग्रामपंचायतीचा “क्षयरोगमुक्त गाव” म्हणून विशेष सन्मान करण्यात आला आहे. क्षयरोग निर्मूलनाच्या दिशेने केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे केंदूरने गव्हाणे सन्मान मिळवलं आहे. जागतिक क्षयरोग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषदेत आयोजित कार्यक्रमात केंद्रूर (ता. शिरूर) ग्रामपंचायतीचा क्षयरोगमुक्त (टीबीमुक्त) गाव म्हणून सन्मान करण्यात आला. सरपंच प्रमोद प-हाड, उपसरपंच शालन…

शिक्रापूर ग्रामपंचायतीकडून दिव्यांग बांधवांना ३० लाखांहून अधिक निधीचे वाटप
शिक्रापूर ता.शिरूर, दि. २३ मार्च — शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात दिव्यांग बांधवांना प्रत्येकी ₹३४,९७२ रुपयांच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी एकूण ३० लाखांहून अधिक निधीचे वितरण शिक्रापूर ग्राम नगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर विशेष आनंद पाहायला मिळाला. धनादेश वितरण प्रसंगी शिक्रापूरचे आदर्श सरपंच…

कोरेगाव भिमा येथे कीयोन कंपनीत शिरला बिबट्या..
नागरिकांनी काळजी घ्यावी, वनविभाग कर्मचारी कियोन कंपनीत दाखल बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू – सहाय्यक वनसंरक्षक स्मिता राजहंस कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथे सकाळी एक दीड दोन वर्षांचा बिबट्या गव्हाणे वस्ती जवळ असलेल्या कियोन कंपनीत शिरल्याने मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाच्या अधिकारी स्मिता राजहंस यांनी नागरिकांनी घाबरून जावू नये व नागरिकांनी सावधगिरी बाळगावी…

हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स आगीची दुर्घटना नव्हे हत्याकांड! चालकाने घडवले जळीतकांड..
ज्यांच्यावर रोष होता, तेच वाचले…निष्पाप मात्र जिवानिशी गेले.. पुणे – हिंजवाडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसलेले होते.दरम्यान, याच आगीच्या घटनेतील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती. खु्द्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडवून…

सणसवाडीत सुरू होणार लावणी महोत्सव – उपसरपंच राजेंद्र दरेकर
सणसवाडीकरांची घोषणा दिनांक १६ मार्च सणसवाडी (ता.शिरूर)पारंपारीक लावणी जपण्याचे काम तब्बल ३५ वर्षांपासून सणसवाडीतील अंबीका कलाकेंद्रापासून तर पुजा व लक्ष्मी कलाकेंद्र करीत आहेत. लावणीचे गाव म्हणून सणसवाडी गावची ओळख निर्माण करण्यातही लावणी कलाकारांचे मोठे योगदान आहे. पर्यायाने अकलुज लावणी महोत्सवाचे धर्तीवर लवकरच गावात सणसवाडी चलावणी महोत्सव सुरू करण्याची घोषणा येथील उपसरपंच राजुआण्णा दरेकर यांनी केली….

शिरुरमधील कारेगाव येथे इन्स्टाग्रामवर मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अत्याचार करणाऱ्या विधी संघर्षित बालकास पोलीसांनी घेतले ताब्यात दिनांक ९ मार्च – सोशल मिडियावरील इंस्टाग्रामवर ओळख आणि मैत्री करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १६ वर्षीय विधी संघर्षित बालकास ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मार्च २०२५ रोजी दुपारी ३ वाजता व ६ मार्च रोजी दुपारी २ च्या सुमारास कारेगाव ता.शिरूर जि पुणे…