Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
माणिक दादा सातव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित महाआरोग्य शिबिरात २२ हजार रुग्णांची तपासणी
“दादांच्या समाजसेवेचा वसा आणि वारसा जपत सर्वसामान्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसणार” – कु. सार्थक माणिकराव सातव कोरेगाव भिमा – वाघोली (ता. हवेली) येथे स्वर्गीय माणिकराव दादा सातव पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त कुमार सार्थक माणिकराव सातव पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या शिबिरास २५ ते ३० हजार नागरिकांनी भेट दिली…
समाजातील विकृत विचारसरणीला आळा घालण्यासाठी मुल्यसंस्कार आणि स्वसंरक्षण अभियानाची गरज – नितीन मोरे
शिक्रापूर आणि चाकण येथे पार पडलेल्या सामूहिक सरस्वती पूजन व विद्यारंभ सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. शिक्रापूर, (ता. शिरूर) “समाजातील विकृत विचारसरणी दूर करण्यासाठी आणि अप्रिय घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी सुसंस्कारासोबतच स्वसंरक्षण तंत्राचे शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचवणे अत्यावश्यक आहे,” असे मत नितीन मोरे यांनी व्यक्त केले. ते दिंडोरीप्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने आयोजित सामूहिक सरस्वती…
पुण्यात गिरक्या घेत हेलिकॉप्टर कोसळलं, हॉटेल गारवाजवळ घडली दुर्घटना
जीवित हानी नाही.. चार प्रवासी जखमी पुणे – पुणे जिल्ह्यातील पौड भागात आज सकाळी हेलिकॉप्टर दुर्घटना घडली आहे. हेलिकॉप्टर मुंबईहून उड्डाण करून आंध्र प्रदेशच्या विजयवाडाकडे जात असताना पुण्यातील घोटोडे भागाच्या हद्दीत एका डोंगराजवळ कोसळले. या दुर्घटनेत चार प्रवासी होते, ज्यापैकी दोन गंभीर जखमी झाले आहेत, तर उर्वरित दोघे स्थिर अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे….
गणेश कुटे युवा मंचच्या वतीने दहीहंडी उत्सवाचे आयोजन
विविध मालिकांमधील तारकांची लाभणार उपस्थिती आव्हाळवाडी (ता. हवेली)गणेश (बापू) कुटे युवा मंचच्या वतीने आव्हाळवाडी येथे रविवारी अखिल दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला मालिकांमधील कलाकारांसह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार असून दहीहंडी उत्सवाच्या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे, विशाल कुटे, अजित कुटे, तुषार कुटे व गणेश (बापू)…
मनोज जरांगे पाटलांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना तुकडे तुकडे करण्याची धमकी
पुणे – जरांगे पाटील यांचे वकील ॲड. गणेश म्हस्के यांना अज्ञाताने मोबाईलवर तुकडे तुकडे करण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी अज्ञाताविरोधात लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. १७ ऑगस्ट २०२४) रात्री दहा वाजेच्या सुमारास ॲड. गणेश म्हस्के घरी जात असताना त्यांच्या मोबाईलवर अज्ञाताने…
वाघोलीकरांच्या समस्यांसाठी ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन
मॅरेथॉन मध्ये सहभाग होणाऱ्या सर्वांनी एक रुपया आणण्याचे आवाहन जमा होणारी रक्कम महानगर पालिकेला देणार भेट वाघोली (ता. हवेली) येथील नागरिकांच्या विविध समस्यांमधून सुटका होण्यासाठी रावलक्ष्मी फाऊंडेशनच्या वतीने ‘रन फॉर वाघोली’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजता अभिषेक लॉन्स, वाघेश्वर मंदिराजवळ, पुणे नगर रोड, वाघोली येथून सुरू होणार…
कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे नगर रस्ता रोको आंदोलन
कोरेगाव भिमा – पेरणे फाटा (ता. शिरूर) येथे कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने अध्यक्ष सर्जेराव वाघमारे व सहकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आले. याबाबत कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा संघाच्या वतीने पुणे जिल्हा दंडाधिकारी सुहास दिवसे,पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस उपआयुक्त परीमंडल क्र. ४. पुणे शहर हिंमतराव जाधव, वरिष्ठ…
पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’
अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…
पुणे, नगर रोड घेणार मोकळा श्वास जंबो फ्लाय ओव्हर उभारत ट्रॅफिक जॅम मुक्त करणार – अजित पवार
सणसवाडी येथील जन सन्मान येत्रेत घोषणा सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार…
वढू बुद्रुक येथील महिला भगिनींनी मानले महाराष्ट्र शासनासह मातोश्री समूहाचे आभार…
मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच…