
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील जन सन्मान यात्रेची जय्यत तय्यारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे विधानसभेच्या पार्श्याभूमीवर अनेकांचे लक्ष तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह पक्ष यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची…

जे जे इंटरनेशनल स्कूल च्या निल मैड ची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
करंदी (ता. शिरूर) येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विध्यार्थी निल प्रशांत मैड याची चौदा वर्षीय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामधुन निवड झाली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी अंथरणे ता. इंदापूर येथे टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या…
पिंपळे जगताप येथे ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…
गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला. पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी…

जीव देण्यापूर्वी आई वडिलांचे शेवटचे शब्द आमची मुले आजीकडे राहतील आमचा कोणावरही विश्वास नाही
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे…

सणसवाडी येथे निसर्गाच्या सान्निध्यात भरली संस्कार शाळा
बहुभाषिक, विविध प्रांतातील विद्यार्थी एकत्रित शिक्षण घेत जपतायेत राष्ट्रीय एकात्मता सणसवाडी (ता.शिरूर) येथील नरेश्वर विद्यालय, वसेवाडी व सणसवाडी जिल्हा परिषद शाळा या तिनही शाळांच्या ४ हजार विद्यार्थ्यांची एकत्रित संस्कारशाळा येथील नरेश्वर मंदिर पठारावर भरली. भारतीय संस्कृतीचे धडे, पालकांच्या आदराच्या गुजगोष्टी आणि विद्यार्थीदशेतील स्वयंघडवणूकीचे अनेक उपक्रम या संस्कार शाळेत संपन्न झाले. सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श संस्कारांचे उपक्रम…

अखेर …पिंपळे जगताप ग्रामस्थांचे रस्त्यांसाठी साखळी उपोषण सुरू
पिंपळे जगताप (ता.शिरूर) गावच्या हद्दीतील भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाल्यामुळे येथून कामगार,विद्यार्थी,नागरिक व वृद्ध नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ त्रस्त झाल्याने या त्रासामुळे सर्व ग्रामस्थ एकत्र येत साखळी उपोषण सुरू केले असून यात ग्रामस्थांचा मोठा सहभाग दिसत आहे. जिल्हाधिकारी, पुणे प्रदेश विकास प्राधिकरण, सामाजिक बांधकाम…

चार दिवसांच्या बाळाला मुंबईत आणण्या अगोदर पोलीस बापाचा मृतदेह दारात
मुंबई – मुंबईतील कांजूर स्थानकावर रविवारी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. चार दिवसांपूर्वीच रवींद्र बाळासाहेब हाके यांचे आयुष्य एका नव्या बाळाच्या आगमनाने आनंदात न्हाले होते. मुंबईत भाड्याने घर घेऊ आणि पत्नी व बाळासोबत राहू, अशा उत्साहाने त्या पोलिसाने घराचा शोध सुरू केला.कुटुंबाच्या सोयीसाठी मुंबईत घर शोधण्याचा उत्साह त्यांनी दाखवला होता. परंतु, नियतीला काही वेगळेच…

जिल्हा स्तरीय नाट्य सपर्धेत कोरेगाव भिमा येथील शिवंश मोटे जिल्ह्यात प्रथम
कोरेगाव भिमा गावच्या शिरपेचात नाट्य स्पर्धेतील प्रत्म क्रमांकाचा मनाचा तुरा कोरेगाव भिमा ( ता. शिरूर) येथील पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता पहीलितील विद्यार्थी शिवंश अतुल मोटे या विद्यार्थ्याने शिवबाची शिकवण हे नाटक जिल्हा स्तरावर सदर करत प्रथक क्रमांकाचे बक्षीस व पदक मिळवल्याने त्याचे व कुटुंबीय व मार्गदर्शकांचे कोरेगाव भिमा पंचक्रोशीसह शिरूर तालुका व पुणे जिल्ह्यातून…

खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि व्हॉटस्अप हॅक
खासदार सुळे यांनी व्हॉट्स ॲप टीम व पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ पोस्ट करून यांसदर्भातील माहिती दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या x अकाऊंटवर, ‘माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे….

कोरेगाव भिमा येथील गणेशनगर मध्ये गटाराचे पाणी आले रस्त्यावर
सरपंच संदीप ढेरंगे व ग्रामपंचायत सदस्य शरद ढेरंगे यांनी गणेशनगर येथे तातडीने भेट देत प्रत्यक्ष केली पाहणी कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील गणेशनगर मधील नागरिक गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असल्याने लहान मुले,शालेय विद्यार्थी व महिला यांच्यासह नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रासाला सामोरे जावे लागत असून याबाबत कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे व ग्राम पंचायत सदस्य…