
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने ‘होम मिनिस्टर’ खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम उत्साहात संपन्न
महिला आरोग्य शिबीर, व्याख्यान, रोजगार मार्गदर्शन व विविध महिला स्पर्धांचे आयोजन शिक्रापूर (ता.शिरूर) येथे आदर्श सरपंच रमेश गडदे व सर्व ग्राम पंचायत सदस्यांच्या संकल्पनेतून मकर संक्रांतीच्या निमित्ताने आरोग्य शिबिरात महिला भगीनिंच्या आरोग्याची तपासणी व विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. आरोग्य शिबीर, व्याख्यान,होम मिनिस्टरयावेळी विजेत्या पाच महिला भगिनींना पैठणी, ओहन, मिक्सर, पंखा, इस्त्री,कुकर अशा बक्षिसांची…

सखे, मला माफ कर, तू कुठं थांबू नकोस, तुझं आयुष्य जग.’ शिरीष महाराजांचे भावी पत्नीसाठी काळीज पिळवटून टाकणारे अखेरचे शब्द
पुणे – माझ्या प्रत्येक निर्णयात साथ दिलीस. मी हात सोडला तर माझी वाट पाहिलीस. माझ्या संघर्षात उभी राहणारी माझी सखे तू माझ्या चांगल्या वेळेची हकदार होतीस. मला माफ कर. तुझी सगळी स्वप्नं तोडून जातोय. कुंभमेळा राहिला, वारी राहिला, किल्ले राहिले, भारत दर्शन राहिलं. सगळंच राहिलं. मी काहीही न देता माझ्या झोळीत भरभरून दान टाकलंस तू….

धक्कादायक ! कोरेगाव भीमामध्ये पोलिसांनी रोखला अल्पवयीन मुलीचा बालविवाह
कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिक्रापूर पोलिसांचे पथक तसेच ग्रामविकास अधिकारी यांनी बालविवाह रोखत अल्पवयीन युवतीची होणाऱ्या बालविवाहातून सुटका करत पालकांना समज दिली आहे. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे एका सोळा वर्षीय अल्पवयीन युवतीचा तिचे पालक सदर युवती अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील ३ फेब्रुवारी…

पुण्यामध्ये राज्य कर निरीक्षक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले
पुणे येथील जी.एस.टी. कार्यालयातील राज्य कर निरीक्षक तुषारकुमार माळी (वय ३३) यांना ५,००० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ला.प्र.वि.) रंगेहाथ पकडले. तक्रारदार वकिली व्यवसायात असून, एका व्यापारी अशिलाच्या जी.एस.टी. नंबर पुनर्जिवीत करण्यासाठी त्यांनी कार्यालयात तक्रार केली होती. तक्रारीनुसार, तुषारकुमार माळी यांनी कामासाठी ५,००० रुपयांची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणीनंतर आज येरवडा कार्यालयात लाच स्वीकारताना माळी…

आमदार निरंजन डावखरे प्रतिष्ठाणच्या वतीने सणसवाडीत अडीच कोटींच्या आरोग्य विम्यासह १५०० लाभार्थ्यांना विविध योजनांचा मोफत लाभ
दिनांक ४ फेब्रुवारी – सणसवाडी (ता.शिरूर) आमदार अॅड.निरंजन डावखरे प्रतिष्ठानचे वतीने तसेच भारतीय पोस्ट विभागाच्या वतीने पुढाकाराने आयोजित येथील वीस शासकीय योजनांच्या दोन दिवसीय मोफत शिबीरात तब्बल दिड हजार लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून यामध्ये आधार दुरुस्ती, बाल आधार, ई-श्रम कार्ड तसेच पोस्टाच्या जनरल इन्शुरन्स विम्यासाठी कामगार वर्गाची मोठी गर्दी राहिली. तब्बल अडीच कोटींच्या पोस्टाच्या मेडीक्लेम…

“कोरेगाव भीमात महिला क्रिकेट संघाच्या कर्णधार आचल आगरवाल यांच्या हस्ते ध्वजवंदन, सरपंच संदीप ढेरंगेंनी केला खेळाडूंचा अनोखा सन्मान
कोरेगाव भीमा, ता. २८ , कोरेगाव भीमा (ता. शिरूर )येथील ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप ढेरंगे यांनी प्रजासत्ताक दिनी स्वतःचा ध्वजवंदनाचा मान महाराष्ट्र राज्य महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी निवड झालेल्या आँचल मनोज आगरवाल या गावातीलच गुणी खेळाडूंना देत समाजासमोर आदर्श घालून दिला असून महिला खेळाडूंचा सन्मान, मिळालेला मान गावातील गुणी महिला खेळाडूस देणे ही गावाप्रती असलेली सामाजिक…

मेळघाटातील कुपोषित बालकांच्या आयुष्याला सोनेरी झळाळी देणारा अवलिया म्हणजे भगवान कोपरकर – व्यवस्थापक सुरेश साळुंखे
दिनांक २५ जानेवारीसमाजसेवक शांतीलाल मुथा व भारतीय जैन संघटनेचे सामाजिक कार्य समाजातील उपेक्षित व दुर्लक्षित घटकांसाठी व्यापक व सर्वसमावेशक समाजसेवेचे काम करत असते असाच एक प्रकल्प भूकंप ग्रस्त मुलांच्या व मेळघाटातील कुपोषित, दुर्लक्षित मुलांच्यासाठी राबवण्यात आला होता. यावेळी संस्थेतील कर्मचारी भगवान कोपरकर यांनी मेळघाटात अत्यंत दुर्गम आदिवासी पाड्यांवर जात येथील मुलांना शिक्षणासाठी बी जे एस…

दौंड हादरलं! तिच्यावर अत्याचार कर आणि मारून टाक’, शाळेतल्या पोरानं दिली सुपारी
शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका विद्यार्थ्याने एका विद्यार्थिनीवर आधी बलात्कार करावा, नंतर मारून टाकावं यासाठी सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे संबधित शाळेने प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केल्यानंतर मोठा वाद उद्भवला. मुख्याध्यापकसह दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल – दौंडच्या इंग्रजी शाळेमधील धक्कादायक प्रकार उघड आलाय. शाळेतीलच विद्यार्थिनीला…

पुणे ग्रंथोत्सवात कवी संतोष काळे यांचा सन्मान
शिक्रापूर – दिनांक २५ जानेवारी, पुणे येथील महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड येथे आयोजित ग्रंथोत्सव २०२४ या दोन दिवसीय ग्रंथ महोत्सवामध्ये कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई, तसेच जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाने साहित्यप्रेमींना एकत्र आणले. दिनांक २३…

वडिलांच्या मृत्यूची वार्ता समजताच दुःख सहन न झाल्याने लाडक्या लेकीने संपविले जीवन
एकाच वेळी बापलेकिची निघाली अंत्ययात्रा नाशिक – दिनांक २५ जानेवारी. वडिलांच्या आकस्मिक निधनाच्या दुःखाने भावनाविवश होऊन २९ वर्षीय तरुणीने स्वतःच्या आयुष्याचा दुर्दैवी अंत केला. नाशिकच्या जेलरोड परिसरातील भीमनगर येथे ही हृदयद्रावक घटना घडली असून बापलेकीच्या मृत्यूने परिसरात दुःख व्यक्त करण्यात येत आहे. मारुती वाघमारे (वय ६५) यांना प्रकृती बिघडल्यानंतर बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….