
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

दानशुरांनो चौदा वर्षीय समर्थला हवा मदतीचा हात
लहान मुले खेळताना अनेकदा पडतात, धडपडतात, तर कधी छोटे अपघातही होतात. पण, जेजुरीतील समर्थ रणनवरे या चौदा वर्षीय मुलाला खेळताना झालेल्या अपघाताची आपण कल्पना करू शकत नाही. समर्थ मित्रांसमवेत बॅडमिंटन खेळत होता. बॅडमिंटनचे फूल समोरच्या घरावरील टेरेसच्या टोपीवर पडले. ते काढण्यासाठी गेलेल्या समर्थला उच्च दाबाच्या (३३ केव्ही) विजेच्या वाहिनीचा धक्का बसला अन् तो ५० टक्के…

गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणार – महसूलमंत्री बावनकुळे
राज्यात मागील अनेक वर्षे गावठाण क्षेत्राचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे गावठाण क्षेत्राचा विस्तार करुन जमिनीच्या नोंदी अद्ययावत करण्यात येणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. यासाठी नगररचना नियमांनुसार अंतर्भाव करण्याच्या बाबींसंदर्भात नगररचना विभागाने माहिती सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. गावठाण क्षेत्राबाहेरील मिळकतींसाठी स्वामित्व योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात बैठक झाली. महसूल विभागाचे अपर…

पुण्यात महसूल सहाय्यक महिलेला शेतकऱ्याकडून २५ हजारांची लाच घेताना अटक
इंदापूर तहसील कार्यालय येथे महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या कावेरी विजय खाडे यांना शेतकऱ्याकडून २५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रेम वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील तक्रारदार यांच्या वडिलांची ३९ गुंठे जमीन आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्याबाबत सन…

धक्कादायक ! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर बलात्कार
दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने…

खेड मधील बहुळ येथे घरावर सशस्त्र दरोडा, दोघांना चाकूने भोकसले घराची फरची रक्ताने लाल
पुणे – बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर…

वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत…

शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न
बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…

लग्नावरून परतताना ज्यूस पिण्यासाठी थांबले, भरधाव कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू
दोघेजण गंभीर जखमी दि. १६ फेब्रुवारी – गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) या शिक्षिकेच्या मृत्यूची आणि दोन जणांच्या गंभीर जखमी होण्याची घटना समोर आली आहे. गायत्री ठाकूर आणि सहकारी शिक्षिका नीलम जाचक सोमेश्वर लॉन्सवर एका शाळेतील लग्नाहून परतत असताना ज्यूस पिण्यासाठी स्टॉप केली होत्या. दुपारी…

पत्नी व मुलाचा गळा चिरून युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न
नागपूर – नंदनवन येथे एका व्यावसायिक युवकाने झोपेत असलेल्या पत्नीच्या गळ्यावर चाकूने हल्ला केला तसेच मुलावरही वार केला. मात्र, दुसऱ्या मुलाने शेजाऱ्यांना आवाज दिल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर युवकाने स्वतःचा गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली. जखमी महिलेचे नाव पिंकी नांदूरकर (३२, बगडगंज) असून आरोपी रवी नांदूरकर…

रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…