
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

अपशिंगे मिलिटरीत लोकनियुक्त सरपंचांविरोधात गावकऱ्यांचे गुप्त मतदान
अविश्वास ठराव २५६ मतांनी मंजूर, जिल्ह्यातील पहिलीच घटना सातारा तालुक्यातील अपशिंगे मिलिटरी गावात शुक्रवारी (दि.१२) झालेल्या मतदान प्रक्रियेत लोकनियुक्त सरपंचांविरोधात अविश्वास ठराव प्रथमच मंजूर करण्यात आला. या घटनेने केवळ अपशिंगेच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात राजकीय चर्चांना ऊत आला आहे. गावातील सरपंच तुषार शिवाजी निकम यांच्याविरोधात हा अविश्वास ठराव आणण्यात आला होता. लोकनियुक्त सरपंच निवडून…

पैलवान झेंडू पवार यांना ‘मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न’ पुरस्कार प्रदान
शिरूर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता.शिरूर): क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील श्रीमती बबईताई टाकळकर आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान झेंडू पवार यांना ‘मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. मिशन ऑलिंपिक गेम्स असोसिएशन इंडिया आणि दिल्ली पॅरामेडिकल…

युवकांनो, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या: प्राचार्य डॉ. संजय चाकणे
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर – तळेगाव ढमढेरे (ता.शिरूर) येथे बलशाली भारताच्या निर्मितीसाठी राष्ट्रनिष्ठा आणि समर्पणाची भावना असणाऱ्या युवकांची आज खरी गरज आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आणि शैक्षणिक संशोधन…

बीजेएस महाविद्यालयाचा कॅडेट कॅप्टन पवन राठोड राष्ट्रीय नौसैनिक शिबिरात ठरला मानकरी
कठोर परिश्रम, शिस्त आणि समर्पणातून राष्ट्रीय स्तरावर कामगिरी वाघोली, १० सप्टेंबर २०२५ : भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थी आणि ३ महाराष्ट्र नेव्हल युनिट एनसीसीचा कॅडेट कॅप्टन पवन राठोड याने लोणावळा येथील इंडियन नेव्हल शिप (INS) शिवाजी येथे झालेल्या अखिल भारतीय नौसैनिक शिबिर २०२५ मध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व…

शिक्रापुरातील श्रीमंत गणराज मित्र मंडळाचा गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श
प्रतिनिधी राजाराम गायकवाड गणेशोत्सव, भक्ती आणि समाजसेवा यांचा त्रिवेणी संगम,३०० मोफत चष्मे वाटप, रक्तदान, वृक्षारोपण, कीर्तन , खेळ पैठणीचा आणि दिव्यांगांचा सुरेल ऑर्केस्ट्रा असे कौतुकास्पद कार्य करणारा समाजभान जपणारा मंडळ ठरला शिक्रापूरकरांचा मानाचा तुरा शिक्रापूर ( ता.शिरूर) युवाशक्ती, सामाजिक जागृती आणि समाजभान जपणारी अनोखी गणेश भक्ती अशा त्रिवेणी संगम साधणाऱ्या शिक्रापूर येथील श्रीमंत गणराज मित्र…

कोरेगाव भिमा येथे विसर्जन मिरवणुकीत अप्पाचा नाद नाय आणि पोलिसांचा मंडळांना धाक नाय
डीजेवर कार्यकर्ते बेभान, कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण, वाहनाच्या रांगा ट्रॅफिक जाम,अडकलेल्या रुग्णवाहिका , ढोलताशांचा पारंपरिक ठेका पण सामाजिक संदेश देणारे देखावे हरवले, पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा सर्वसामान्य नागरिक व प्रवाशांना फटका, कायदा सुव्यवस्थेचा उडाला बोजवारा कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने नागरिक हैराण तर तालावर नाचणारे कार्यकर्ते बेभान झाल्याचे दिसून आले.त्यात…

कोंढापुरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून स्मशानभूमी परिसरात स्वच्छता मोहिम
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर) : कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील कचरा हटवून रस्त्याची स्वच्छता केल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या रस्त्यावर पडलेल्या कचऱ्यामुळे नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत होते. दशक्रिया विधीसाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व पाहुण्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. कोंढापुरीचे ग्रामदैवत खंडोबा मंदिर आणि जवळच असलेला पाझर तलाव या परिसरातील…

विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत टाळावी – ॲड. प्रिया कोठारी
रांजणगाव गणपती (ता.शिरूर) मंगलमूर्ती विद्याधाम प्रशालेमध्ये नुकताच विद्यार्थी आणि पालकांसाठी समुपदेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून प्रसिद्ध ॲड. प्रिया कोठारी यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, सायबर क्राईम, व्यसनाधीनता आणि चुकीची संगत यांसारख्या आजच्या ज्वलंत समस्यांवर प्रकाश टाकत विद्यार्थी व पालकांना मोलाचा सल्ला दिला. ॲड. प्रिया कोठारी यांनी…

शिक्रापूर येथे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आधार फाउंडेशन तर्फे गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षकांना ट्रॉफी, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला विस्तार अधिकारी राजेंद्र टिळेकर , आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, केंद्रप्रमुख अनिल पलांडे, केंद्रप्रमुख लंघे, शाळेच्या…

गोरगरिबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – संस्थापक विठ्ठल ढेरंगे
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) : परिसरातील शेतकरी, कामगार आणि सभासदांच्या अनेक गरजांना साथ देत त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे तसेच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे महत्वाचे कार्य कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून, मागील ३६ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठल ढेरंगे यांनी केले. संस्थेची ३६ वी वार्षिक सभा चेअरमन नामदेव ढेरंगे यांच्या अध्यक्षतेखाली…