
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

धक्कादायक! मांजरी खुर्द येथे फळविक्रेत्या दांपत्याची आत्महत्या
मांजरी खुर्द (ता.हवेली) – पुण्यातील वाघोली जवळील मांजरी खुर्द येथे एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागनाथ वारुळे (वय ४३) आणि त्यांची पत्नी उज्वला वारुळे (वय ४०) या फळविक्रेत्या दांपत्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना रविवारी (११ मे) रात्री घडली असून सोमवारी (१२ मे) सकाळी उघडकीस आली. प्राथमिक…

शिक्रापूरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशानंतर विजय रॅलीद्वारे भारतीय लष्कराला सलाम
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशस्वीतेनंतर ग्रामस्थांनी भव्य विजय रॅलीचे आयोजन करून लष्कराच्या पराक्रमाला सलाम केला. या रॅलीत शेकडो नागरिकांनी सहभागी होऊन ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ले करून…

शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण
शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…

स्वच्छता हि प्रत्येक नागरिकाची जबाबदारी- अतिरिक्त अभियान संचालक शेखर रौंदळ
कार्ला (ता. मावळ) दिनांक १मे – देशाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. वैयक्तिक स्वच्छतेसोबत प्रत्येकाने सार्वजनिक स्वच्छता ही अंगीकृत करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत कंपोस्ट खड्डा भरू, आपल गाव स्वच्छ ठेवू” ही मोहीम यशस्वी होण्यासाठी प्रत्येक नागरिकानी आपली जबाबदारी ओळखून यशस्वी पार पाडावी असे प्रतिपादन अतिरिक्त अभियान…

महाराष्ट्र दिनानिमित्त शिक्रापूर येथे स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार सोहळा उत्साहात संपन्न
विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूरच्या विद्यार्थ्यांचा एम. पी. एस. सी परीक्षेत यशस्वी डंका शिक्रापूर (ता.शिरूर) दिनांक १मे – विद्याधाम प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय शिक्रापूर येथे आज एम पी एस सी परीक्षेत विविध पदांवर नियुक्त झालेल्या प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत…

भारतीय जैन संघटना विद्यालय गुणवत्तेत जिल्ह्यात अव्वल
वाघोली, ता. २४: पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभाग व पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या गुणवत्ता संवर्धन अभियानात वाघोली येथील भारतीय जैन संघटना विद्यालयाने १००० पेक्षा अधिक विद्यार्थी गटामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावून आपले गुणवत्ता नेतृत्व सिद्ध केले आहे. या अभियानात संपूर्ण जिल्ह्यातील तब्बल १५०० शाळांनी सहभाग घेतला होता. शाळांच्या भौतिक सुविधा,…

जनतेच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; आता एसएमएसद्वारे मिळणार माहिती
सरकारी कार्यालये आता एक क्लिकवर; ‘पीजीआरएस’ प्रणालीने कामकाजाला नवी दिशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दौऱ्यात जनतेचे अर्ज, निवेदने आणि तक्रारी यावर तात्काळ आणि सकारात्मक कार्यवाही करण्यासाठी पब्लिक ग्रिव्हेन्सेस रिड्रेसल सिस्टिम (PGRS) या ऑनलाईन प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. या प्रणालीद्वारे अर्जदारास त्याच्या अर्जाची सद्यस्थिती एसएमएसद्वारे कळवली जाणार आहे. शासनाच्या तंत्रज्ञानाधिष्ठित कामकाज धोरणानुसार ही प्रणाली तयार…

धक्कादायक! पेरणे फाटा येथे भीषण आग, गॅसच्या टाक्यांच्या स्फोटाने हादरला परिसर
कोरेगाव भिमा – दि. २१ एप्रिल पेरणे फाटा (ता. हवेली) रात्री दोन च्या सुमारास अचानक आग लागली व आगीने रौद्र रूप धारण केल्याने तसेच शेजारी असणाऱ्या गॅसच्या टाक्यांनी पेट घेत मोठ्या आवाजात स्फोट झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते वाघोली येथील अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने दाखल झाल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले….

चासकमान कालव्यातून शिक्रापूर परिसरात पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी
शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मोठ्या प्रमाणात झालेले नागरिकीकरण, शेती, जनावरे व पशुपक्षी यांची तहान भागवणे व पिकांना जागवण्यासाठी शिक्रापूर ग्राम पंचायतीच्या वतीने चासकमान कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली असून रणरणत्या उन्हाता शेतकरी, नागरिक, जनावरे व पशुपक्षी यांच्यासाठी तरी आता पाणी सोडण्यात येणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून चासकमान बंधारे विभाग टाटाकीम पाणी…

पुण्याच्या खेड तालुक्यातील बलात्कार व खून प्रकरणातील आरोपीच्या घराला व ट्रॅक्टरला आज्ञातांकडून पेटवून देण्याचा प्रयत्न..
मांजरेवाडी (धर्म, ता. खेड) मुलीच्या अपहरण अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीचे घर व घरासमोरील ट्रॅक्टर पेटवण्याचा प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिस व अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्याने पुढील मोठा अनर्थ टळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास…