
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

बायकोसाठी कायपण! मध्य प्रदेशात पतीने पत्नीसाठी बांधलं ताजमहालासारखं घर
मध्य प्रदेशातील बुरहानपूर येथे एका पतीने आपल्या पत्नीच्या आवडीनुसार खास ताजमहालसारखं आलिशान घर बांधलं आहे. आनंद प्रकाश चौकसे असं या गृहस्थाचं नाव असून, त्यांनी आपल्या पत्नीसाठी 4BHK घर उभारलं आहे.हे घर पाहताना खरा ताजमहालच समोर आहे असं वाटतं. पांढऱ्या मकराना संगमरवरातून उभारलेलं हे घर आकाराने मूळ ताजमहालाच्या तुलनेत एक तृतीयांश लहान आहे, पण सौंदर्य आणि…

पुण्यात मावळामध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, चार जणांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
पुणे, दि. १५ जून – पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी मोठी दुर्घटना घडली. इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल अचानक कोसळल्याने पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली. रविवारी सुट्टी असल्यामुळे कुंडमळा येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक जण पुलावर उभे…

सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म
सर्पमित्राच्या गाडीतच घोणस सापाने दिला २७ पिल्लांना जन्म शिरुर तालुक्यातील शिक्रापूरजवळील मलठण फाटा परिसरात सर्पमित्राच्या गाडीतच एक अतिविषारी घोणस जातीचा साप मादी असल्याचे लक्षात येताच मोठा आश्चर्यकारक प्रकार समोर आला. या सापाने थेट कारमध्ये ठेवलेल्या बरणीतच तब्बल २७ पिल्लांना जन्म दिला असून, या दुर्मीळ घटनेने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पावसाच्या सरी सुरू असताना…

Air India Flight Crash: लंडनला निघालेल्या डॉक्टर दाम्पत्याचा ३ मुलांसह करून अंत
महिनाभरापूर्वीच सिलेक्शन, स्वप्न अधुरे राहिले! अहमदाबाद,: १३ जून २०२५– अवघ्या महिन्याभरापूर्वीच लंडनमधील हॉस्पिटलमध्ये नोकरीसाठी निवड झालेल्या डॉ. प्रतीक जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉ. कौनी व्यास तसेच त्यांच्या तीन चिमुकल्या मुलांचा अहमदाबाद विमानतळावर गुरुवारी (१२ जून २०२५ रोजी) झालेल्या भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनमध्ये नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचे या कुटुंबाचे स्वप्न होते, मात्र…

शिरूर हत्याकांड : प्रेमसंबंधातून महिला व दोन मुलांची हत्या, आरोपी अटकेत
शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती हद्दीत २५ मे रोजी एका बंद कंपनीमागे अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या महिला आणि दोन मुलांच्या मृतदेहांचे गूढ पुणे ग्रामीण पोलिसांनी उलगडले आहे. प्रेमसंबंधातून ही तिहेरी हत्या झाल्याचे निष्पन्न झाले असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. रांजणगाव गणपती येथील खंडाळा माथा परिसरात निर्जन ठिकाणी हे मृतदेह सापडल्याने सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे पोलिसांसाठी…

कोरेगाव भिमा येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
६ जून २०२५ – कोरेगाव भिमा (ता.शिरूर) ग्रामपंचायतमध्ये रोजी शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच श्री. संदीपदादा ढेरंगे, माजी पंचायत समिती सदस्य पी. के. आण्णा गव्हाणे, माजी घोडगंगा सहकारी साखर कारखाना संचालक कैलासराव सोनवणे, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक…

लाच घेताना महावितरणचा सहायक अभियंता आणि खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात!
पुणे: घरगुती वीज कनेक्शन मंजूर करण्यासाठी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना महावितरणचा सहायक अभियंता रामप्रसाद नरवडे आणि एक खाजगी इसम श्यामलाल असोकन यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज रंगेहाथ पकडले. ही धडाकेबाज कारवाई पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील महावितरण कार्यालयात करण्यात आली असून, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका शासकीय विद्युत ठेकेदाराने एसीबीकडे तक्रार…

कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!
“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा
वढू बुद्रुक (ता. शिरूर) “सामाजिक कार्य हीच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी आपला वाढदिवस वंचित आणि उपेक्षित घटकांप्रती कळवळा दाखवत, वढू बुद्रुक येथील माहेर सामाजिक संस्थेत उत्साहात साजरा केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी केवळ एक दिवस नव्हे, तर आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारणी नव्हे, समाजाच्या…

“गोपीनाथ मुंडे तुमच्यामध्येच आहेत, मी त्यांनाच पाहते!” — पंकजा मुंडेंचा भावूक उद्गार
गोपीनाथ गड (परळी)- गोपीनाथ मुंडे यांच्या ११व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात माजी मंत्री पंकजा मुंडे भावूक झाल्या. “गोपीनाथ मुंडे आपल्यातून गेले याला ११ वर्षे झाली, पण ते आजही आपल्या मनामध्ये आहेत. त्यांच्या विचारांना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही या कार्यक्रमांचे आयोजन करतो,” असे त्या म्हणाल्या. पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, “अपघाताने माणसे दुरावतात आणि कधी…