Category: Latest Update
शिक्रापूरमध्ये ‘पर्यावरणपूरक मंदिर’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी राजाराम गायकवाड शिक्रापूर: श्रावणी सोमवारच्या पवित्र दिनी, शिक्रापूर गावात एक अनोखा आणि स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. विद्यादाम प्रशाला, शिक्रापूर येथील १९८७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामपंचायतीने एकत्र येत ‘पर्यावरणपूरक मंदिर’ ही मोहीम सुरू केली. या उपक्रमांतर्गत गावातील चार मंदिरांमध्ये पॉलिथीनमुक्त परिसरासाठी प्रयत्न करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश मंदिरांचे परिसर स्वच्छ आणि पॉलिथीनमुक्त…
बालरंगभूमी परिषदेच्या नाट्यछटा स्पर्धेत बालकलाकारांचा जल्लोष!
राजाराम गायकवाड जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर): बालरंगभूमी परिषद आणि पिंपरी-चिंचवड शाखेने आयोजित केलेल्या कै. सौ. मनीषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा २०२५ मध्ये राज्यातील बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. या स्पर्धेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “या स्पर्धांमधून मुलांमधील कलागुणांना वाव मिळतो. शिक्षण क्षेत्रात अशा…
‘शिवाजी महाराजांनी प्रतिकूल काळात स्वराज्य घडवले’ – ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे
राजाराम गायकवाड शिक्रापूर (ता. शिरूर ) छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि त्यांनी राज्याची स्थापना केली, तो काळ सोयीचा नव्हता, तर तो अत्यंत प्रतिकूल होता. या प्रतिकूलतेवर मात करत महाराजांनी स्वराज्य घडवले, असे प्रतिपादन ह.भ.प. बिपिनमहाराज कोरडे यांनी शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे केले. कोंढापुरी येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या समारोप प्रसंगी, काल्याचे कीर्तन…
वाडेबोल्हाईत बिबट्याचा धुमाकूळ घोडीचे शिंगरू व ५ मेंढ्यांचा पाडला फडशा
ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वन विभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी हवेली : दि. १७ ऑगस्ट , वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याने मानवी वस्तीत शिरून पाळीव प्राण्यांवर हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. काल (दि.१७) मध्यरात्री बिबट्याने धावलदरा-गायकवाड वस्तीत गणपत बरकडे यांच्या कळपावर हल्ला करून घोडीचे शिंगरू ठार केले. याआधी आठवडाभरापूर्वी खुटाळी-बारांगनी वस्तीत शेतकरी गणेश…
सरपंच संदीप ढेरंगे यांच्या पाठीवर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची कौतुकाची थाप
दिल्ली: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नवी दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून एकमेव आदर्श सरपंच म्हणून कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीचे सरपंच, संदीप ढेरंगे यांची निवड झाली आहे. या विशेष निमंत्रणामुळे पुणे जिल्ह्यासह कोरेगाव भीमा गावासाठी हा एक मोठा सन्मान आहे.या गौरवपूर्ण क्षणापूर्वी सरपंच संदीप ढेरंगे यांनी पत्नी अंजली ढेरंगे आणि गावकऱ्यांसह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ…
पत्नी नांदायला येत नाही तसेच नंबर ब्लॉक केल्याने बापाने चार मुलांना विहिरीत ढकलून केली आत्महत्या
राहाता (अहिल्यानगर) : कौटुंबिक वादातून राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात पित्याने आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.मृतांची नावे – अरुण सुनील काळे (वय ३०, रा. चिखली, ता. श्रीगोंदा) मुले : शिवानी (८), प्रेम (७), वीर (६) व कबीर (५)अरुण काळे याची पत्नी शिल्पा माहेरी (ता. येवला) गेली होती….
लोणीकंद शाळेत स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती…
मोबाईलच्या जगातून निसर्गाच्या कुशीत; वृक्षदिंडी ते वनभोजन असा पाच हजार विद्यार्थ्यांना शिक्षण, खेळ व निसर्गप्रेमाची प्रेरणा देणारा सणसवाडीचा विधायक उपक्रम
“पर्यावरण, शिक्षण आणि संस्कारांचा संगम घडवणारे प्रेरणादायी नेतृत्व म्हणजे सरपंच रुपाली दगडू दरेकर व उपसरपंच राजेंद्र दरेकर सणसवाडी (ता. शिरूर) –आजची पिढी मोबाईल आणि इंटरनेटच्या आभासी जगात गुरफटली असताना, सणसवाडी ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांना निसर्गाशी पुन्हा जोडण्याचा आगळावेगळा प्रयोग यशस्वीपणे राबवला आहे. उपसरपंच राजेंद्र दरेकर यांच्या संकल्पनेतून आणि सरपंच रुपाली दरेकर यांच्या सहकार्याने सणसवाडी व परिसरातील सात…
खेळाडूंना आणि विशेषतः ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना प्रोत्साहन देणार – कृषी मंत्री दत्ता भरणे
लोणीकंद (ता. हवेली) येथील न्यू टाइम स्कूलमध्ये झालेल्या सीबीएसई क्लस्टर क्रीडा स्पर्धांच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आणि शेती हिताचे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं.न्यू टाइम स्कूल यांच्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक करत ग्रामीण भागातील दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करत असल्याबाबत भूमकर कुटुंबीयांचे कौतुक केले. खेळाडूंना…
लोकशाहीच्या लढ्यात योगदान देणाऱ्या संतू ढेरंगे यांचा महाराष्ट्र शासनाकडून सन्मान
कोरेगाव भीमाच्या मातीतील संतू आनंदा ढेरंगे म्हणजे ‘लोकशाही सैनिक’ – माजी संचालक विठ्ठल ढेरंगे कोरेगाव भिमा (ता.शिरूर) महाराष्ट्र शासनामार्फत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोरेगावभिमा येथील संतू आनंदा ढेरंगे यांना १९७५ ते १९७७ या काळात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विरोधात लोकशाहीच्या रक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे. आणीबाणीच्या कठीण काळातही ढेरंगे यांनी लोकशाही मूल्ये,…
