
Category: स्थानिक वार्ता

सणसवाडी येथे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २० लाखांच्या रस्त्याचे भूमिपूजन
सणसवाडी (ता. शिरूर) येथील डोंगरवस्ती-पिंपळे जगताप रोड या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. स्थानिक नागरिकांची मागणी आणि परिसरातील रहदारीच्या सोयीसाठी हे काम हाती घेण्यात आले आहे. आमदार अशोक पवार यांनी , “सणसवाडीत आजवर अनेक विकास कामे करण्यात…

बेकर्ट कंपनीच्या पंचनाम्यातून ११ वाहने गायब! पंचनामा पुन्हा करण्याची ग्रामस्थांची मागणी
सरपंच-उपसरपंच, तक्रारदार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुन्हा पंचनामा करण्याचे निवेदन शिरूर तहसिलदार , पुणे जिल्हाधिकारी व पोलीस यांना लवरच दिले जाणार असल्याचे अॅड.विजयराज दरेकर व सागर दरेकर यांनी सांगितले. सणसवाडी (ता.शिरूर) येथील इस्पात कंपनीच्या आवारातील ग्रॉझ बेकर्ट कार्डिंग कंपनीच्या हद्दीत मंगळवारी केलेल्या पंचनाम्यात गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. डायनामाईटसारख्या घातक स्फोटकांचा वापर करून बेकायदेशीर उत्खनन करण्यात आले…

स्फोटांच्या आवाजाने सणसवाडी हादरली, बेकर्ट कंपनीच्या ब्लास्टींगबाबत महसूल विभागाकडून पंचनामा
सदर प्रकरणी पोलीस तपासाची ग्रामस्थांची मागणी सणसवाडी (ता. शिरूर) येथील इस्पात प्रोफाईल कंपनीच्या हद्दीत असलेल्या १० एकरांमध्ये चाललेल्या बेकर्ट कार्डिंग इंडिया लिमिटेड कंपनीच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरला आहे. या स्फोटांमध्ये डायनामाईटसारख्या वापर होत असल्याची माहिती मिळताच महसूल विभागाने तात्काळ हस्तक्षेप करत स्फोटकांचे काम थांबवले आहे. शिरूर तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या च्या आदेशानुसार तलाठी गोविंद घोडके…

ज्ञानेश्वर कटके यांच्यावर दिर्घायुष्यासह भावी आमदार होण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव
शिरूर-हवेलीमध्ये लोकप्रियतेला उधाण, सुसंस्कृत नेत्याच्या वाढदिवसानिमित्त हजारो नागरिक, कार्यकर्ते, विविध पदाधिकारी यांची लक्षणीय उपस्थिती वाघोली (ता.हवेली) शिवसेना (उबाठा) पुणे जिल्हा प्रमुख तथा जि.प. सदस्य ज्ञानेश्वर (आबा) कटके यांच्या वाढदिवसानिमित्त वाघोलीत मोठ्या जल्लोषात कार्यक्रम पार पडला. कटके यांना शुभेच्छा देण्यासाठी शिरूर-हवेलीतील नागरिकांसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, आणि मान्यवरांनी उपस्थितीत लावत दीर्घायुष्यासह भावी आमदार म्हणून शुभेच्छांचा वर्षाव…

आमदार अशोक पवार यांच्याहस्ते कोरेगाव भिमा येथे ३२ लाखांच्या दिव्यांग निधीचे दिव्यांगांना वाटप
राज्यातील पहिली ग्रामपंचायत जिने दिव्यांगांना त्यांचा संपूर्ण निधी दिला – धर्मेंद्र सातव कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायत व सरपंच संदिप ढेरंगे यांच्या माध्यमातून चांगली विकास कामे सुरू असून ४५ दिव्यांग बांधवांना ३२ लाखांचा निधी वितरीत करणारी व सगळा निधी देणारी ग्राम पंचायत असून इतरांच्या डोळ्यातील अश्रू पुसत त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा…

शिक्रापूरमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संतप्त मोर्चा; आरोपीला फाशीची मागणी
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे तीन वर्षीय चिमुरडीवर अल्पवयीन युवकाने लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व विविध सामाजिक संघटनांनी मोर्चा काढत आरोपीला कठोरात कठोर शिक्षा, अर्थात फाशीची मागणी केली आहे. या निषेध मोर्चात शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना निवेदन देण्यात…

डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत जागतिक फार्मासिस्ट दिवस उत्साहात साजरा
कोरेगाव भिमा (ता.शिरूर) येथील अल अमीन एज्युकेशनल अँड मेडिकल फाउंडेशन संचलित डिलाईट इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेज मध्ये जागतिक फार्मासिस्ट दि. २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोरेगाव भीमा येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करून पथनाट्य सादर केले. तसेच स्थानिक मेडिकल शॉपमधील फार्मासिस्टांचा सत्कार करण्यात आला. जागतिक फार्मासिस्ट…

चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी
चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…

धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर…

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त
शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…