तळेगाव ढमढेरेत बिबट्या जेरबंद; वनविभागाची तत्पर कारवाई, नागरिकांना दिलासा
प्रतिनिधी राजाराम गायकवाड तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील जगताप वस्ती व चौधरी वस्ती परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे वारंवार दर्शन होत होते. या बिबट्याने काही ठिकाणी पशुधनावर हल्ले केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर शिरूर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक मादी बिबट्या जेरबंद करण्यात यश आले असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे….
