ग्रामसेविकेकडे शरीर सुखाची मागणी, विस्तार अधिकाऱ्याला धु..धु.. धुतलं , तोंडाला फासले काळे 

Swarajyatimesnews

राज्यात एक खळबळ जनक घटना उघडकीस आली असून ग्रामसेविकेकडेच शरीर सुखाची मागणी करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्याला  त्याच्या कार्यालयात जावून शिवसैनिकांनी जब विचारला असता आधी त्याने या प्रश्नी उडवा उडवीची उत्तर दिली.त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी चोप देत महिलेने तोंडाला काळे फासले. हा सर्व प्रकार धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा पंचायत समितीत झाला. त्यानंतर पंचायत कार्यालयात एकच खळबळ उडाली.(A sensational incident has come to light in the state. When Shiv Sainiks went to his office and questioned the extension officer who demanded physical pleasure from a gram sevika, he first gave a rude answer to this question. Due to this, the enraged Shiv Sainiks beat the woman and blackened her face. All this happened in Shindkheda Panchayat Samiti in Dhule district. After that, there was a commotion in the panchayat office.)

शिंदखेडा पंचायत समितीमध्ये विस्तार अधिकारी आहेत. त्यांच्यावर शिंदखेडा तालुक्यातील ग्रामसेविका असलेल्या महिलने गंभीर आरोप केले आहेत. या महिलेने अधिकाऱ्यावर विनयभंगाचा आरोप केला आहे. शिवाय २०२० पासून ते महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहेत. गेल्या चार वर्षापासून हा प्रकार सुरू आहे. वारंवार होणाऱ्या या त्रासाला या ग्रामसेविका कंटाळल्या होत्या.

सतत होणारा हा जाच त्यांना असह्य झाला होता. त्यामुळे आत्महत्या करण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. अशा वेळी त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्याकडे झालेला प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी शिंदखेडा पंचायत समिती येथील विस्तार अधिकाऱ्याच्या कार्यालय गाठले तेथे संबधित अधिकारी ही उपस्थित होता. 

   अगोदर संबधित अधिकाऱ्याला महिलेने केलेल्या तक्रारीची त्यांना माहिती देण्यात आली. शिवाय तुम्ही असं का करत आहात असा जाबही त्यांना विचारण्यात आला. अशा वेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. त्यामुळे शिवसैनिक संतप्त झाले. पिडीत महिला ही त्यावेळी तिथे उपस्थित होती. तीने त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळे फासले. त्यानंतर त्याला चोप देण्यात आला. शिंदखेडा पंचायत समिती येथे हा प्रकार घडला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली.

विस्तार अधिकार्‍याला फासले काळे

यानंतर संतप्त महिला ग्रामसेविका आणि  ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी विस्तार अधिकार्‍याला काळे फासत चांगलाच चोप दिलाय. आता शिंदखेडा येथील विस्तार अधिकारी एस के सावकारेवर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!