अजित दादांच्या निधनानंतर निवडणुकीत सहानुभूतीची लाट, शांततेत प्रचाराला मतदारांचा मोठा प्रतिसाद

Swarajyatimesnews

लोणीकंद (ता. हवेली) पुणे-नगर महामार्गालगतचा आणि भीमा नदीच्या तीरावरील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गटात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. “मतदारांनी साथ दिल्यास या गटाचा चेहरामोहरा बदलून विकासाचे एक ‘स्मार्ट’ मॉडेल उभे करू,” असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रदीपभाऊ वसंतराव कंद यांनी व्यक्त केला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे सध्या मतदारसंघात शोककळा असून, प्रदीपभाऊ वसंतराव कंद यांच्यासह पंचायत समितीच्या उमेदवार लोचन शिवले आणि संगिता वाळके यांचा प्रचार अत्यंत शांततेत आणि श्रद्धांजलीपर पद्धतीने सुरू आहे. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेली सहानुभूती आणि कंद यांच्या कार्यामुळे मतदारसंघात ‘घड्याळाची’ मोठी लाट पाहायला मिळत आहे.

केवळ रस्ते नव्हे, तर ‘स्मार्ट’ विकास! : विकासाची भूमिका मांडताना प्रदीपभाऊ वसंतराव कंद म्हणाले की, “जिल्हा परिषद गटाचा विकास म्हणजे केवळ डांबरी रस्ते नव्हे, तर नागरिकांच्या जगण्याचा स्तर उंचावणे आहे. गेल्या २५ वर्षांपासून आम्ही जनसेवेत आहोत. आता PMRDA च्या माध्यमातून मोठा निधी खेचून आणून भूमिगत सांडपाणी योजना, कचरा व्यवस्थापन आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यास आमचे प्राधान्य असेल.”

अजितदादांच्या स्वप्नपूर्तीचा ध्यास : प्रदीप वसंतराव कंद यांनी यावेळी श्री क्षेत्र तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाच्या सर्वांगीण विकासाचा पुनरुच्चार केला. अजितदादांनी पाहिलेला या परिसराच्या विकासाचा आराखडा पूर्ण करणे, हे आपले पहिले पाऊल असेल, असे त्यांनी आवर्जून सांगितले. शिक्षण, आरोग्य, वीज आणि रस्ते या मूलभूत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा शब्दही त्यांनी मतदारांना दिला.

संकटात धावून जाणारे ‘सेवाभावी’ नेतृत्व : प्रदीप वसंतराव कंद यांची ओळख केवळ एक राजकीय नेता म्हणून नाही, तर ‘माणुसकीचे दुसरे नाव’ म्हणून मतदारांमध्ये आहे. कोविडच्या कठीण काळात त्यांनी बजावलेली ‘कुटुंब प्रमुखाची’ भूमिका, अन्नधान्य वाटप, मोफत लसीकरण आणि दिव्यांगांना केलेली मदत यामुळे त्यांच्याबद्दल मतदारसंघात मोठी आपुलकी आहे.

“राजकारण म्हणजे केवळ सत्ताकारण नसून ते संकटात लोकांच्या पाठीशी उभे राहणे आहे. पेरणे-लोणीकंद गटातील प्रत्येक गावाला आदर्श बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” — प्रदीप वसंतराव कंद (उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस)

लोचन विजय शिवले: लोणीकंद पंचायत समिती उमेदवार

संगिता जालिंदर वाळके: पेरणे पंचायत समिती उमेदवार

सध्या या तिन्ही उमेदवारांच्या प्रचार दौऱ्याला गावोगावी ग्रामस्थांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून, ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर आणि अजितदादांच्या स्मृतींना अभिवादन करत जिंकण्याचा विश्वास राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. – प्रदिप वसंतराव कंद, जिल्हा परिषद उमेदवार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!