“वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा गांधींच्या निषेधापासून मुख्यमंत्रीपदापर्यंत फडणवीस यांची प्रेरणादायी यशोगाथा”

Swarajyatimesnews

इंदिरा गांधींनी आणीबाणीत वडिलांना तुरुंगात टाकले म्हणून मला त्यांच्या नावाच्या शाळेत शिकायचे नाही असे वयाच्या सहाव्या वर्षी सांगत शाळा बदलणारे, वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि दोन वेळा मुख्यमंत्री – देवेंद्र फडणवीस यांची उत्तुंग वाटचाल  

महाराष्ट्राच्या राजकीय पटावर आपले वेगळे स्थान निर्माण करणारे नेते, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस, हे नाव आज प्रत्येकाच्या ओठांवर आहे. विद्यार्थिदशेपासून राजकारणात सक्रिय असलेल्या फडणवीस यांनी वयाच्या २२ व्या वर्षी नगरसेवक, २७ व्या वर्षी महापौर, आणि ४४ व्या वर्षी मुख्यमंत्रीपद मिळवून एक विलक्षण प्रवास घडवून आणला आहे. जाणून घेऊया, त्यांचा प्रवास कसा होता आणि त्यांची प्रेरणादायी गोष्ट!  (From changing schools at the age of six, saying that he did not want to study in a school named after Indira Gandhi because she had imprisoned his father during the Emergency, to becoming a corporator at the age of 22, mayor at the age of 27, and two-time Chief Minister – the heroic journey of Devendra Fadnavis)

वडिलांचा आदर्श आणि विद्यार्थी दशेतील संघर्ष – २२ जुलै १९७०  रोजी नागपुरात जन्मलेले फडणवीस एका राष्ट्रीय स्वयं संघाच्या संस्कारात व राष्ट्रभक्ती बाळकडू घेत मोठे झाले. संस्कारशिल वधनुकिक विचारसरणीच्या  ब्राह्मण कुटुंबात वाढले. त्यांचे वडील गंगाधर राव हे जनसंघाशी संबंधित आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर देवेंद्र यांच्यावर मोठी जबाबदारी आली. मात्र, त्यांनी शिक्षणासोबत राजकीय चळवळींमध्ये सहभाग घेतला. इंदिरा गांधींनी लागू केलेल्या आणीबाणीच्या विरोधात शाळेत दाखल असलेले नाव काढून टाकण्याचा निर्णय, हा त्यांचा राजकीय व्यक्तिमत्त्वाचा पहिला दाखला होता.  

आणीबाणीत माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केले म्हणून मी त्यांच्या नावाच्या शाळेत शिकणार नाही – आणीबाणीच्या काळात फडणवीस यांच्या वडिलांना गंगाधर फडणवीस जनसंघाचे सदस्य असताना, सरकारविरोधी आंदोलनात भाग घेतल्याबद्दल तुरुंगवास भोगावा लागला होता.

‘माझ्या बाबांना इंदिरा गांधींनी अटक केली त्यामुळे मी इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये शिकणार नाही, असे आणीबाणीच्या काळात वयाच्या सहाव्या वर्षी देवेंद्र यांनी आईला बजावून सांगितले. फडणवीस यांनी नंतर इंदिरा कॉन्व्हेंटमध्ये त्यांचे शालेय शिक्षण सुरू ठेवण्यास नकार दिला कारण त्यांना पंतप्रधानांच्या नावाच्या शाळेत जायचे नव्हते कारण त्यांनी वडिलांना तुरुंगात टाकले होते. त्यानंतर त्यांना  नागपूरच्या सरस्वती विद्यालय शाळेत दाखल करण्यात आले, जिथे त्यांनी त्यांचे बहुतांश शालेय शिक्षण घेतले.  संघ, जनसंघाच्या संस्कारांचे बाळकडू मिळालेला तोच मुलगा पुढे भाजपाचा प्रदेशाध्यक्ष आणि नंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाले.

२२ व्या वर्षी नगरसेवक ते ४४ व्या वर्षी मुख्यमंत्री – फडणवीस यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) पासून केली. १९९२ मध्ये नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत वयाच्या २२ व्या वर्षी ते नगरसेवक बनले. अवघ्या पाच वर्षांत त्यांची मेहनत आणि नेतृत्वगुण ओळखले गेले, आणि १९९७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी ते “नागपूरचे सर्वात तरुण महापौर” बनले.  

त्यानंतर १९९९ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि २०१४ मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. फडणवीस हे ४४  व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी बसलेले महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण नेते ठरले. त्यांच्या नेतृत्त्वाखाली भाजपा सरकारने राज्यात ऐतिहासिक बदल घडवून आणले.  

८० तासांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाचा प्रवास – २०१९ मध्ये फडणवीस यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, परंतु हा सरकार अवघ्या ८० तासांत कोसळला, ज्यामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत एक अनोखा अध्याय लिहिला गेला. नंतर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्यात नवीन समीकरणे तयार झाली, आणि २०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली.  

शिक्षण, कुटुंब, आणि मॉडेलिंग –  फडणवीस यांनी कायद्याची पदवी घेतली असून, जर्मनीतून बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस एक बँक अधिकारी आणि गायिका आहेत. दोघांना एक मुलगी आहे.  फडणवीस यांच्याकडे नागपूर विद्यापीठाच्या शासकीय विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी, व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी आणि DSE-जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, बर्लिन, जर्मनी येथून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा आहे

अटल बिहारी वाजपेयी त्यांना “मॉडेल” आमदार म्हणायचे  – आश्चर्याची गोष्ट म्हणजे, फडणवीस यांनी एकदा मॉडेलिंगही केले आहे. २००६ मध्ये नागपूरच्या चौकाचौकात झळकलेल्या त्यांच्या मॉडेलिंगच्या होर्डिंग्जमुळे ते चर्चेत आले होते. खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांना “मॉडेल आमदार” असे संबोधले होते.  

पुस्तकांवरही फडणवीस यांचा प्रभाव –  फडणवीस केवळ राजकारणातच नव्हे, तर साहित्यामध्येही रस घेतात. त्यांनी अर्थसंकल्पावर एक पुस्तक लिहिले ” अर्थसंकलप सोप्या भाषेत ” हे पुस्तक लिहिले ह्यामागे राजकारणी व सर्वसामान्य माणसांना आर्थसंकलप समजावा क कळवा हा उद्देश होता. 

लोकप्रिय नेते आणि प्रेरणा – आज, महाराष्ट्राच्या राजकारणात  देवेंद्र फडणवीस हे चतुर नेतृत्व, स्पष्ट विचार, आणि दृढ निर्णयक्षमतेसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नेतृत्वाची प्रेरणा अनेक तरुणांसाठी आदर्श आहे.  

     त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास यशाची नवी उंची दाखवतो आणि राजकारणात कसे सतत शिकत आणि पुढे जात राहायचे, याचे उत्तम उदाहरण ठरले आहेत!.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!