वडगाव रासाई (ता. शिरूर) – महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात निष्ठावान आमदार व सक्षम नेतृत्व करणाऱ्या आमदार अशोक पवार यांच्या निष्ठा, प्रामाणिकपणा, आणि जनतेच्या सेवेशी जोडलेली नाळ यामुळे शिरूर-हवेली मतदारसंघात त्यांनी विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा वाढदिवस यंदा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी खास क्षण होता, यावेळी सर्वांनी मिळून त्यांना आगामी काळात मंत्रिपद मिळावे, अशी आशा व्यक्त केली.
जनतेचा कौल : आमदार अशोक पवार यांना मंत्रिपद हवेच – शिरूर-हवेली मतदारसंघातील नागरिक, कार्यकर्ते, आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते अशोक पवार यांच्या विकास कामांच्या धडाडीमुळे भारावून गेले आहेत. त्यांच्या निष्ठेने व प्रामाणिकपणाने प्रत्येकाची मने जिंकली आहेत. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळून अशोक पवार यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी, अशी इच्छा कार्यकर्त्यांसह सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
आकर्षक हार आणि विशेष केक – वडगाव रासाई येथे झालेल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. या वेळी, अशोक पवार यांना सणसवाडी करांनी १५० किलो वजनाचा आणि २० फूट लांबीचा गुलाबाच्या फुलांचा हार गळ्यात घालण्यात आला. विशेषतः हा हार व केक उपस्थितांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या हाराच्या सोबतच, मंत्रालयाच्या प्रतिकृतीसह लाल दिव्याची गाडी आणि अशोक पवार यांचा प्रतीकात्मक केक देखील सादर करण्यात आला. हा केक त्यांच्या जनसेवेच्या निष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे प्रतीक म्हणून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून गेला.
शरद पवारांच्या निष्ठेचा वारसा जपणारा नेता – आमदार अशोक पवार यांनी शरद पवार यांच्या विचारधारेची निष्ठा कायम जपली आहे. कोणताही अन्याय सहन करताना किंवा टोकाची टीका सहन करताना त्यांनी आपला प्रामाणिकपणा कायम राखला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळोवेळी त्यांच्या या निष्ठेची दखल घेतली आहे. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेल्या भाषणाचे व्हायरल व्हिडिओ याचीच साक्ष देतात. “अशोक बापू आमदार” हे गाणे आणि मंत्री पदाच्या शुभेच्छांनी भारावलेल्या या वातावरणात, सर्वत्र उत्साहाची लाट उसळली होती.
विकासाचा आलेख आणि भविष्याची आशा – कोरोना काळात त्यांनी केलेले अद्वितीय कार्य, महापुराच्या संकटात दिलेला आधार, आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचा विकास आराखडा, अशा विविध प्रकल्पांमुळे शिरूर-हवेली मतदारसंघातील जनता अशोक पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आहे. त्यांच्या रचनात्मक विकास कार्यामुळे त्यांच्या गळ्यात मंत्री पदाची माळ लवकरच पडावी, अशी जनतेची प्रखर इच्छा आहे.
निष्ठेचा उत्सव: भविष्याच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल – आमदार अशोक पवार यांनी आपल्या कार्यकाळात निष्ठा आणि प्रामाणिकपणाचे उत्कृष्ट उदाहरण निर्माण केले आहे. त्यांच्या निस्वार्थ सेवेच्या भावनेने आणि दूरदृष्टीच्या विकासाच्या आकांक्षेने, त्यांनी शिरूर-हवेली मतदारसंघात विकासाची नवी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.
माजी सभापती सुजाता पवार व ऋषिराज पवार यांची माणुसकी – विविध ठिकाणांहून आलेले कार्यकर्ते,नेते व महिला भगिनींना पाहुणचार करत जेवणाचा, नाष्ट्याचा आग्रह करत वैयक्तिक लक्ष घालत पाहुणचार करत होते तर चेअरमन ऋषिराज पवार आलेल्या नागरिकांना हसतमुख सामोरे जात आग्रहाने फोटो काढण्यासाठी व जेवण करण्यासाठी स्वतः घेऊन जात होते.यामुळे आमदार अशोक पवार व माजी सुजाता पवार यांच्या सेवेचा वारसा जपणारे ऋषीराज पवार यांच्या माणुसकी व आत्मीयतेने कार्यकर्त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.
यावेळी पुणे जिल्ह्यासह शिरूर हवेलितील अनेक नेते,कार्यकर्ते, विविध पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक,माता भगिनी व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.