ह.भ.प. कबीर महाराज अटार यांचे कीर्तन; भाविकांना उपस्थित राहण्याचे गावरे परिवाराचे आवाहन
विठ्ठलवाडी (ता. शिरूर) येथे कै. ताईबाई ज्ञानोबा हरगुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार, दि. ५ नोव्हेंबर २०२६ रोजी धार्मिक कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला हिंदू धर्मभूषण ह.भ.प. कीर्तनकार कबीर महाराज अटार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या कीर्तनातून भाविकांना आध्यात्मिक विचारांची मेजवानी मिळणार आहे.
सकाळी १० ते १२ या वेळेत हा कीर्तन सोहळा पार पडणार आहे. यावेळी गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि हार्मोनियम वादक कलाकारांची साथ लाभणार आहे. कार्यक्रमाचे नियोजन कु. प्रतीक्षा गवारे (संचालिका, हिंदवी अकॅडमी) यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.
कै. ताईबाई हरगुडे यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसेच कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील भाविक, नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त गावरे परिवार आणि समस्त ग्रामस्थ विठ्ठलवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
