शिक्रापूर (ता.शिरूर) येथील आधार फाउंडेशन आणि विद्याधाम प्रशाला यांच्या वतीने शिक्रापूरमधील आरोग्य सेविकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. समाजासाठी आरोग्य सेवा देणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करून त्यांच्या कार्याला दाद देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक गंगावणे होते. यावेळी आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे, डॉ. प्रतीक्षा आठवले, आरोग्य सहायिका अवनी आल्हाट, सुजाता खैरे, पल्लवी हिरवे, सचिव गणेश गायकवाड, निलेश जगताप, चंद्रकांत मांढरे, सचिन भोसले, सुरेश चव्हाण, सतीश तायडे, राजेंद्र पाखरे, बाळा गायकवाड, गुंजन मोहोड आणि शितल जाधव उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन : कार्यक्रमात आधार फाउंडेशनचे अध्यक्ष सुभाष खैरे यांनी फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली आणि आरोग्य सेविकांना शुभेच्छा दिल्या. तसेच डॉ. प्रतीक्षा आठवले, कल्पना ढोकले आणि शारदा लंघे यांनी अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती देऊन बारावीनंतरच्या करिअर संधींबाबत मार्गदर्शन केले.
मानाचा फेटा देऊन सन्मान :उपस्थित सर्व आरोग्य सेविकांना आधार फाउंडेशनतर्फे मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब गावडे यांनी केले, तर निलेश जगताप यांनी सर्व मान्यवर आणि आरोग्य सेविकांचे आभार मानले.
