कोरेगाव भिमा येथे खाजगी बसला भीषण; आगपुणे-नगर महामार्गावर वाहतूक कोंडी

Swarajyatimesnews

पोलीस, अग्निशमन दलाच्या व ग्रामस्थांच्या मदतीने आगीवर नियंत्रण

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) — पुणे-नगर महामार्गावर, कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ गुरुवारी (आठवडे बाजाराच्या दिवशी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास एका खाजगी कंपनीच्या बसने अचानक पेट घेतला. यामुळे महामार्गावर काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

बाजाराच्या दिवशी आग: गुरुवार असल्याने कोरेगाव भीमा येथे आठवडे बाजार होता आणि रस्त्यावर मोठी गर्दी होती. खाजगी कंपनीच्या बसणे अचानक पेट घेतल्याने पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र निर्माण झाले पण ग्रामस्थ, पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने कार्यतत्परता दाखवत आगीला नियंत्रणात आणल्याने पुढील अनर्थ टळला.

कोरेगाव भीमा येथे डिंग्रजवाडी फाट्यावर खाजगी कंपनीच्या बसणे अचानक पेट घेतल्याने रस्त्यावर आग व धुराचे लोळ दिसू लागले त्यात गुरुवार असल्याने कोरेगाव भीमा येथे आठवडे बाजारामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यात सायंकाळची वेळ कंपनी कामगार व इतर वाहन चालक परतीच्या प्रवासाला असल्याने वाहनाची मोठी गर्दी होती त्यात अचानक खाजगी कंपनीच्या बसणे पेट घेतल्याने सुरुवातीला गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पण ग्रामस्थ व पोलिस प्रशासनाने तातडीने मदत करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत    अग्निशमन दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले व आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

     यावेळी मदतीसाठी अग्निशमन दलाचे इन्चार्ज शुभम चौधरी, वाहन चालक शुभम बढे, अग्निशमक विमोचक सूरज इंगवले,योगेश पाटील, कृष्णा नागरे,सिद्धार्थ जाधव, पोलिस पाटील मालन गव्हाणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख, पोलिस कॉन्स्टेबल श्रावण गुपचे, नाईकवडे व इतर पोलिस कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते साईनाथ गव्हाणे, किरण सव्वाशे, प्रवीण राऊत, गोरक्ष दौंडकर यांच्यासह इतर ग्रामस्थ व प्रवाशांनी मोलाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!