शिरुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन त्याला विवस्त्र करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे ॲड. असीम सरोदे यांनीही पत्रकार परिषद घेत याची सविस्तर माहिती दिली.
ॲड.असीम सरोदे यांनी पत्रकारांशी बोलताना थेट अपहरण झालेल्या ऋषीराज पवारचा आपबिती सांगणारा व्हिडिओ दाखवला. यात रशिरज पवार सांगतायत की, “आमच्यासोबत प्रचारात फिरत असलेल्या एका भाऊ कोळपे नामक एका तरुणानं काही लोकांशी मिटिंग करायची असल्याचं सांगून घेऊन गेला. हा दिवसभर आमच्याबरोबर प्रचारातही फिरला. त्यामुळं हा खेडेगावातला मुलगा असं काही करु शकेल याची मला शंकाही आली नाही. त्यानंतर विश्वास ठेवून आम्ही दोघं माझ्या गाडीत बसलो, त्यानंतर माझ्या ड्रायव्हरनं ती गाडी मांडवगण वडगाव रोडला एका ठिकाणी नेली.
तिथं या कोळपेनं सांगितलं की, पुढे चारचाकी जाणार नाही. तिथं त्यानं आधीच दोन दुचाकी बोलावून घेतल्या होत्या. त्यानंतर तिथं मी त्यांच्या बाईकवर बसलो आणि त्यानंतर त्यांनी मला एका बंगल्यापर्यंत नेलं. त्यानंतर तिथं बसलो आणि मला एका रुममध्ये बोलावलं तिथं गेल्या गेल्या तिघं जण रुममध्य शिरले. तिथं त्यांनी रुमचा दरवाजा बंद केला आणि माझे हातपाय पकडले. एकानं माझ्या शर्टची बटणं उघडली, त्यानंतर मी त्याला विरोध केला”
आपण हे का करत आहात? पैसेच हवे असतील तर आपण हा विषय सोडवू, असं मी त्यांना म्हटलं. त्यानंतर त्यांनी माझ्या तोंडावर एक कापड टाकलं आणि माझा गळा दाबला, मला मारुन टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका पिशवीतून एक दोरी काढली आणि आम्हाला हा व्हिडिओ पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं. तसंच यासाठी आम्हाला १० कोटी रुपयांची ऑफर आल्याचंही स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर माझ्या जीवाला घाबरुन मी ते सांगतील ते करण्यासाठी तयार झालो.
त्यानंतर त्यांनी माझे कपडे काढले आणि चौथ्या माणसानं एका महिलेला आणलं. त्यानंतर भाऊ कोळपे नामक व्यक्तीनं तिघांना बाहेर काढलं. त्यानंतर त्या महिलेसोबत बनावट व्हिडिओ काढला. या व्हिडिओत तो संबंधित महिलेला सूचना देताना दिसतो आहे. नंतर त्यानं महिलेला कुठे पाठवून दिलं मला माहिती नाही. मला जीवाचा धोका वाटत असल्यानं मी त्यांच्याशी थोडं लाडीगोडीत बोलू लागलो. त्यांचा विश्वास मी जिंकण्याचा प्रयत्न केला”
सरोदेंनी सांगितली सविस्तर माहिती यापुढं नेमकं काय घडलं हे सांगताना ॲड. असीम सरोदे यांनी सांगितलं की, “ऋषीराज पवार हा हबकून गेला या अपहरणकर्त्यांनी आपल्याकडं मागितलेले इतके पैसे कुठून आणणार? पण त्यानं थोडं प्रसंगावधान दाखवून सांगितलं की, माझ्याकडं इतके पैसे आत्ता नाहीत. पण तो म्हणाला की माझे प्रचार करणारे जे लोक आहेत त्यांच्याशी भेटून आम्ही काही पैसे देऊ शकतो. पण त्यांनी त्याला सांगितलं की तुझा व्हिडिओ आमच्याकडं आहे त्यामुळं जर तुम्ही पैसे दिले नाहीत तर तो व्हिडिओ व्हायरल करु.
यानंतर तो बाहेर आल्यानंतर चपळाई दाखवून त्यानं तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. तसंच चपळाईनं तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये एअरड्रॉप करुन घेतला होता. त्याचवेळी ज्या बाईला हा व्हिडिओ पाठवण्यात आला होता तो देखील त्यानं डिलीट केला. पण तोवर तो तिनं पुढे फॉरवर्ड केला होता. त्यातीलच काही फोटो आज व्हायरल झाले आहेत. यानंतर ऋषीराज पवार आज शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. घटनास्थळी पोलिस अधिकारी व चेअरमन ऋषी पवार यांच्यासह भेट देण्यात येणार आहे.