भूमकर परिवाराचे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर

स्वराज्य टाइम्स

आदर्श समाजसेवक, आदर्श उद्योगपती, आदर्श शिक्षण महर्षी आणि आदर्श पितृतुल्य बंधुकर्तुत्व , .लोखंडाचं सोनं करणारे परिस म्हणजे आधारवड कै. दत्तात्रय (अण्णा) रामचंद्र भूमकर

कै. श्री. दत्तात्रय रामचंद्र भूमकर ऊर्फ अण्णा यांचा लोणीकंद येथील शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे आई-वडील दोन्ही मामाच्या गावी लोणीकंद येथे शेती करून उदरनिर्वाह करत होते. १९६५ साली त्यांच्या वडिलांनी एक ट्रक घेतला. त्यांनी व्यवसायात पदार्पण केले. १९७४-७५ साली अण्णांच्या वडिलांनी निमगाव-म्हाळुंगी येथे शेती घेतली. त्यामुळे अण्णांचे आई-वडील दोन्हीही निमगावला शेती करण्यासाठी गेले. यामुळे भूमकर कुटुंबाला एक वेगळी व्यावसायिक ओळख मिळाली. त्यातूनच पुढे एक आदर्श उद्योजक म्हणून अण्णा पंचक्रोशीमध्ये नावाजले जाऊ लागले. भूमकर परिवाराचे ते आधारवड ठरले.

स्वराज्य टाइम्स

लोणीकंद गावात १९९६ साली खाण उद्योग अण्णांनी पहिल्यांदाच सुरू केला. २००५ साली श्री रामचंद्र सर्व्हिस स्टेशन नावाने पेट्रोल पंप सुरू केला. त्यांनी २००८ साली श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेची स्थापना केली. संस्थेमध्ये खजिनदारपदावर आजपर्यंत ते काम करीत राहिले. शिक्षण संकुलामध्ये श्री रामचंद्र कॉलेज इंजिनिअरिंग डिग्री डिप्लोमा व एम.ई., तसेच न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूल (CBSE बोर्ड पहिली ते बारावी), श्रीमती समुद्राबाई रामचंद्र भूमकर सायन्स ज्युनियर कॉलेज, श्रीमती समुद्राबाई रामचंद्र भूमकर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, श्री रामचंद्र हॉस्टेल, श्री रामचंद्र ट्रान्सपोर्ट सुरू आहेत. २००९ साली मेटसो कंपनीचा २५० टी.पी. एच. क्षमतेचा क्रेशर प्लॅन्ट अण्णांनी सुरू केला.

श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखाना सुरू होत असताना ५० मुख्य प्रवर्तकामध्ये एक प्रवर्तक म्हणून अण्णांनी उत्तमरीत्या काम केले. लोणीकंद गावामधील सामाजिक कार्यामध्ये अण्णांनी हिरीरीने सहभाग घेतला. त्यामध्ये गावातील यात्रा, हरिनाम सप्ताह, दहीहंडी उत्सव यामध्ये त्यांनी स्वतः मदत व सामाजिक कार्य केले. संत सावतामाळी मंदिर उभारणीमध्ये अण्णांनी भरीव कार्य केले. श्री साईबाबा पालखी, शिरूर हवेली दिंडी यांसारख्या धार्मिक कामांमध्ये अन्नदानाचे काम त्यांनी स्वतः उभे राहून केले. कोरोना काळामध्ये गरीब कुटुंबाला वाड्या-वस्त्यांवर जाऊन अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप त्यांनी केले. अण्णांच्या जीवनप्रवासामध्ये त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम दत्तात्रय भूमकर यांनी त्यांची बरोबरीने साथ दिली.

सोमवार, दि. १५ जुलै २०२४ रोजी अण्णांची प्राणज्योतीमालवली. आदरणीय स्व. अण्णांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती कुसुम दत्तात्रय भूमकर, त्यांचे तीन भाऊ उद्योजक उद्धव रामचंद्र भूमकर, श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती रामचंद्र भूमकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे शंकर रामचंद्र भूमकर, तर दोन मुले प्रसिद्ध उद्योजक पांडुरंग दत्तात्रय भूमकर, श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी स्वप्नील दत्तात्रय भूमकर, तसेच दोन मुली सीमा भरत आल्हाट, सारिका राहुल पारखे, तीन पुतणे गौरव मारुती भूमकार, सिद्धांत शंकर भूमकर, अथर्व मारुती भूमकर, नातवंडे, पतवंडे असा मोठा गोकुळासारखा परिवार आहे.अण्णांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली…

शब्दांकन :- मारुती (बापू) रामचंद्र भूमकर (संस्थापक- श्री रामचंद्र एज्युकेशन सोसायटी तथा प्रसिद्ध उद्योजक)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!