शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांच्या आत्महत्येप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल

स्वराज्य टाइम्स

सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड, सचिन पारखे यांच्यावर गुन्हा दाखल

शिक्रापूर (ता.शिरूर) येथील माजी उपसरपंच रमेश थोरात यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुधीर ढमढेरे (रा. तळेगाव ढमढेरे, ता. शिरुर, जि. पुणे), बबनराव गायकवाड व सचिन पारखे (दोघांचा पत्ता माहिती नाही) या तिघांवर शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Crime News)

स्वराज्य टाइम्स

याबाबत शिक्रापूरचे माजी उपसरपंच रमेश थोरात यांचा मुलगा तुषार रमेश थोरात (वय २८, रा. इकोग्राम सोसायटी, शिक्रापूर, ता. शिरूर) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली.

रमेश थोरात यांनी १ मे रोजी विहिरीमध्ये आत्महत्या केली होती. फिर्यादीनुसार रमेश थोरात हे सप्तर्षी डेव्हलपर्समध्ये भागीदार असून त्यांच्या हिस्स्याचे २८ लाख रुपये त्यांना देण्यास सप्तर्षी डेव्हलपर्सचे अन्य भागीदार सुधीर ढमढेरे, बबनराव गायकवाड व सचिन पारखे हे टाळाटाळ करत असल्याने रमेश थोरात तणावात होते.(Pune Gramin Police)

त्यानंतर रमेश थोरात यांनी वेळोवेळी सुधीर ढमढेरे यांना फोन व मेसेज करून त्यांच्या हिस्स्याचे पैसे मागितले होते, मात्र वारंवार पैशाची मागणी करून देखील तिघेजण त्यांना पैसे देण्यात टाळाटाळ करत असल्याने शेवटी थोरात यांनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!