सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच धर्मराज वाजे माजी विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) येथील श्री छत्रपती संभाजी हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज शाळेच्या मैदानावर पावसाचे पाणी साठल्याने विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना पाण्यातून जावे लागत असून शाळेचे टॉयलेट जाम झाल्याने विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली असुन प्रभारी मुख्याध्यापक वर्षा काळभोर (वाजे) मॅडम यांनी तातडीने यावर उपाययोजना करत विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न केले त्यांना याकामी सरपंच संदिप ढेरंगे व वाजेवाडीचे माजी सरपंच धर्मराज वाजे यांनी मोलाचे सहकार्य केले.
मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय झाली. चाकरमान्यांना कामावर जाताना मोठी कसरत करावी लागली तसेच यातून शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय पाहायला मिळाली. शाळेच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात साचेलेले पावसाचे पाणी, जाम झालेले टॉयलेट त्यामुळे होणारी विद्यार्थिनींची मोठी गैरसोय, पायाला जखमा झालेल्या विद्यार्थ्यांना या पाण्यातून विद्यार्थ्यांना जावे लागत असल्याने प्रभारी मुख्याध्यापक वर्षा काळभोर ( वाजे) मॅडम व त्यांच्या मदतीसाठी सरपंच संदिप ढेरंगे, माजी सरपंच धर्मराज वाजे व इतर ग्रामस्थ यामुळे शाळेच्या मैदानात साठलेल्या पाण्याला काढण्यासाठी ग्राम पंचायत स्वच्छता कर्मचारी यांनी मदतीचा हात देत विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय व होणारा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केले.
याबाबत वाजेवाडीचे माजी सरपंच धर्मराज वाजे यांनी पाणी साठल्याने तातडीने जे सी बी पाठवत व स्वतः उपस्थित राहून साठलेले पाणी जाण्यासाठी मोठी मदत केली तर कोरेगाव भिमाचे सरपंच संदिप ढेरंगे यांनी तातडीने स्वच्छता कर्मचारी व जे सी बी व इतर मदत तातडीने पाठवत साठलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी तसेच जाम झालेली सांडपाणी व गटार पाईप लाईन तातडीने दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी काम सुरू केल्याने काही प्रमाणात पाणी वाहून जाण्यास मदत झाली.
यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र फडतरे व उपाध्यक्ष महेश ढेरंगे यांनी तातडीने मदत पोचवण्यासाठी प्रयत्न केले तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश पारवे, भाजपचे पुणे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रवीण फडतरे, दीपक सालसे यांनी तातडीने मदत करत पाणी कमी होऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला.
शाळेसाठी एकत्र येत सर्वांनी सोबत काम करण्याची एक सामाजिक बांधिलकी कोरेगाव भीमा ग्रामस्थ जपत असल्याने शाळेच्या मैदानावर पाणी साठल्याचे कळल्यावर ग्रामस्थांनी तातडीने मदतीचा जात पुढे करत आपली बांधिलकी जपली.
आमच्या मॅडम काम करतायेत आम्हाला काम करावेच लागेल – मागील अनेक वर्षांपासून प्रभारी मुख्याध्यापिका वर्षा काळभोर (वाजे) मॅडम विद्यादानाचे मोठे काम करत असून गावातील आज प्रतिष्ठित अनेक पदाधिकारी व मान्यवर असणारे अनेक विद्यार्थी काळभोर मदमसी यांचे विद्यार्थी असून शाळेतील मैदानावर पाणी साठले असून ते काढण्यासाठी काळभोर मॅडम स्वतः काम करण्यास सुरुवात केली.यासाठी जे.सी बी बोलावणे , साचलेले पाणी काढण्यासाठी प्रयत्न करणे, विद्यार्थी व विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधत त्यांना महत्वपूर्ण सूचना करत पाण्यापासून होणारे नुकसान टाळण्यासाठी पाण्यात सतत न जाणे अशा सूचना व कामे केली.
यावेळी काळभोर मॅडम यांना काम करताना पाहून विद्यार्थी असणारे प्रवीण फडतरे, गणेश पारवे व इतर मदतीसाठी उपस्थित राहत काळभोर मॅडम व इतर शिक्षक वृंद यांना मोलाचे सहकार्य केले.