शिक्रापूर प्रतिनिधी – राजाराम गायकवाड
शिक्रापूर-चाकण मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय पाचंगे यांनी नियोजित आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही महिन्यांपासून शिक्रापूर-चाकण तसेच कोरेगाव भीमा-शिरूर या रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, खराब साईड पट्ट्या आणि अरुंद रस्त्यांमुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या धोकादायक परिस्थितीमुळे वारंवार अपघात होत असून अनेकांचे बळी गेले आहेत.
या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी करत श्री. संजय पाचंगे यांनी ४ नोव्हेंबर २०२५ पासून शिक्रापूर-चाकण व शिक्रापूर-शिरूर रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये उतरून उपोषण आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती.मात्र संबंधित विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केल्याने पाचंगे यांनी आपले आंदोलन स्थगित केले असून, शासन व प्रशासनाने काम वेळेत व दर्जेदार करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही या निर्णयाचे स्वागत करत पाचंगे यांच्या पुढाकाराचे कौतुक केले आहे.
