पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचंड धावपळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास आणि थकवा जाणवू लागल्याने आज पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
https://x.com/ANI/status/2020791589073764809?s=20
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सांत्वन करण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठींमुळे गेल्या आठवडाभरापासून शरद पवार यांना मोठी दगदग झाली होती. सोमवारी सकाळी पवारांना अस्वस्थ वाटू लागल्याने डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या बारामती येथील ‘गोविंदबाग’ निवासस्थानी पोहोचले. तासभर तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. शरद पवार यांना सध्या खोकला आणि कफचा त्रास होत असून त्यामुळे त्यांना श्वास घेताना अडचण येत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना पुण्यात कार्डियाक ॲम्ब्युलन्सच्या ताफ्यासह आणण्यात आले.
सध्या रुबी हॉलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या विविध वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत.संपूर्ण राज्यभरातून शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
