Breaking News Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकर यांचा महिला आयोग अध्यक्षपदाचा राजीनामा

Swarajyatimesnews

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे Rupali Chakankar यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला असून, प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

​पुणे – राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. नाशिकमधील (Nashik) अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावरून होत असलेले आरोप आणि प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आपला राजीनामा त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला असून, प्रकरणातील सत्य बाहेर यावे हीच आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले.(Ashok kharat)

​अशोक खरात (Ashok Kharat)याच्यावर नाशिकमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे खरातसोबतचे जुने फोटो व्हायरल करून विरोधकांनी त्यांना लक्ष्य केले होते. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसवरही (अजित पवार गट) टीका झाली होती. पक्षनेते प्रफुल्ल पटेल यांनीही या प्रकरणात कठोर कारवाईचे संकेत दिले होते.

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, आमच्या नेत्या तसेच राज्याच्या सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावाहिनींकडे माझ्याकडे असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा सुपूर्द केला.सध्या विविध माध्यमातून होत असलेल्या आरोपांची निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी व्हावी म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारत मी हा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत योग्य तो निर्णय आदरणीय सुनेत्रावहिनी घेतील! या प्रकरणाबाबत लवकरच मी सविस्तर भूमिका मांडेल.

​पत्राद्वारे चौकशीची मागणी: राजीनामा देण्यापूर्वी चाकणकर यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. अशोक खरात प्रकरणाची ‘एसआयटी’ (SIT) मार्फत किंवा उच्चस्तरीय चौकशी करून पीडितेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. “आम्ही कुटुंबासह अध्यात्मिक भावनेतून त्या आश्रमाशी जोडले गेलो होतो, मात्र तिथे असे काही घडत असेल याची पुसटशी कल्पना नव्हती,” असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.

Rupali chakankar
Rupali Chakankar demands High-level Inquiry in Ashok Kharat Case.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!