पोलीस भरतीसाठी गेलेल्या मुलींसाठी अर्ध्यारात्री धावून जात प्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रदीप कंदांच्या सहृदयतेचे व माणुसकीचे होतेय कौतुक
मुंबई सारखे अनोळखी आणि मोठे शहर त्या शिरूर तालुक्यातील पूर्व ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील १० ते १२ मुली रात्री मुंबईसारख्या शहरात पोलीस भरतीसाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा पोहोचल्यानंतर त्यांना राहण्याच्या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. काही ठिकाणी जादा भाड्याचे दर परवडणारे नव्हते, तर काही ठिकाणी सुरक्षेचा प्रश्न होता. त्यामुळे या मुली चिंतेत पडल्या होत्या.ही अडचण रात्री समजताच भावासारखे त्यांच्या मदतीला धावून गेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद त्यांनी शिरूर तालुक्यातील बहिणींच्या मदतीसाठी धावल्याने सर्व स्तरातून प्रदीप कंद यांच्या कार्याचे व मदतीचे कौतुक होत आहे.
ही बाब वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांना याबाबत माहिती दिली. प्रदीप कंद यांनी तत्काळ आपल्या स्वीय सहाय्यक सुशांत लिमये यांना रात्री ११ वाजता मुलींच्या मदतीसाठी पाठवले.
सुशांत लिमये यांनी मुलींना भेटून त्यांची राहण्याची तातडीने व्यवस्था केली आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे घाबरलेल्या मुलींना दिलासा मिळाला.
मुलींनी प्रदीप कंद यांचे आणि त्यांच्या टीमचे आभार मानले. या मदतीसाठी वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार, इनामगावचे मयूर घाडगे, पिंपळसूटीचे विक्रम लगड, आणि सुशांत लिमये यांचे विशेष योगदान राहिले. या तत्परतेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न सुटला आणि त्यांना भावी वाटचालीसाठी आधार मिळाला.