छंद व कला म्हणजे मानवी जीवनाला सोने बनविणारा परिस – माधव राजगुरू
रांजणगाव गणपती (ता. शिरूर) — “मानवी जीवनात जोपासले जाणारे छंद व अंगभूत कला या खऱ्या अर्थाने परिसाप्रमाणे आहेत. त्यांचा उपयोग करून आपण अर्थपूर्ण जीवन जगू शकतो,” असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष माधव राजगुरू यांनी व्यक्त केले. ते संस्थेच्या शिरूर शाखेच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने शिरूर…
