वन्यप्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी, जायबंदी अथवा ठार झाल्यास देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. विशेषतः बिबट्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास २५ लाख रुपये भरपाईपोटी देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील वाड्या, वस्त्यांपर्यंत त्याने हल्ले केल्याच्या बातम्या सतत येतात. बिबटे अन्न-पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येतात. शेतकऱ्यांची पाळीव जनावरे, वस्त्यांवरील भटकी कुत्री यांच्या शिकारी करतात.जिल्ह्याच्या पश्चिमेकडील तालुक्यांत ऊस क्षेत्र आणि जंगली क्षेत्र जास्त असल्याने बिबट्यांचा वावर जास्त आहे. बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला वन विभागातर्फे २० लाख रुपयांची भरपाई दिली जायची.
मानवी मृत्यू झाल्यास २५ लाख मिळणार – बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसदाराला वनविभागातर्फे २० लाख रुपयांची भरपाई दिली जायची. आता २५ लाख मिळतील.
या प्राण्यांकडून हल्ला झाल्यास मिळते मदत
बिबट्या, वाघ, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, माकड यांच्याकडून हल्ला झाल्यास आर्थिक मदत दिली जाते.
हल्ला झाल्यास १९२६ वर करा कॉल – वन्यप्राण्याने हल्ला केल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून माहिती देता येते. त्यानंतर कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करतात. नुकसान भरपाईसाठी वरिष्ठांना अहवाल देतात.
वारसदाराला धनादेश अन् खात्यावर एफडी – मृताच्या जवळच्या वारसदाराच्या नावे भरपाईचा धनादेश दिला जातो. बँक खात्यावर मुदत ठेव ठेवली जाते.
पशुंसाठीही मिळते भरपाई – १) बिबट्या अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येत असतात. त्यातून बिबट्याने किंवा वन्यप्राण्याने शेतकऱ्यााच्या पाळीव पशूवर हल्ला करून त्याला ठार मारल्यास त्याचीही भरपाई जनावरांच्या मालकास वनविभागाकडून देण्यात येते.
२) वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातील मयत किंवा जखमीला ३० दिवसांच्या आत भरपाई देणे बंधनकारक आहे. त्यापुढे विलंब झाल्यास व्याजासह पैसे द्यावे लागतील. तसा निर्णय शासनाने २०२३ मध्ये घेतला आहे.