लोणीकंद-पेरणे गटातील भाविकांच्या देवदर्शन यात्रेत ७५ बसेसची सुसज्ज व्यवस्था; ‘सेवा, समर्पण, संवाद’ या त्रिसूत्रीने विकासाचे ध्येय
लोणीकंद (ता. हवेली): लोणीकंद–पेरणे जिल्हा परिषद गटातील नागरिकांसाठी पै. किरण संपत साकोरे यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रदीपदादा कंद युवा मंच’ आणि मित्र परिवाराने आयोजित केलेल्या भव्य देवदर्शन यात्रांनी धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील नेतृत्वाचा नवा आदर्श प्रस्थापित केला आहे. काशी-अयोध्या (तीन स्पेशल रेल्वे), नागपूर दीक्षाभूमी आणि महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या या यात्रांना साडेतीन हजार भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
दुसऱ्या देव दर्शन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद: बसच्या माध्यमातून पहिला टप्पा हजारो भाविकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने यशस्वी पार पडला. यानंतर दुसऱ्या टप्प्याला भाविकांनी आणखी उदंड प्रतिसाद देत किरण साकोरे यांच्या सेवा, समर्पण, भक्तिभाव, माणुसकीला आणि विकासाच्या दृष्टिकोनाला भरभरून प्रतिसाद दिला.
केवळ उत्तरेकडील यात्राच नव्हे, तर लोणीकंद-पेरणे गटातील भाविकांसाठी महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थानांच्या दर्शनासाठी ७५ बसेसची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली. यामध्ये आदमापूर येथील श्री बाळूमामा, कोल्हापूर येथील महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूर येथील तुळजाभवानी आणि अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाचा समावेश आहे.
याचसोबत, आंबेडकर अनुयायांसाठी आयोजित नागपूर येथील दीक्षा भूमी अभिवादन यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात अनुयायांनी उदंड प्रतिसाद दिला. पहिल्या टप्प्यात देखील हजारो यात्रेकरूंच्या उपस्थितीत यशस्वी झाला. या सर्व यात्रांना मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद किरण साकोरे यांच्या सेवाभावी नेतृत्वावर जनतेचा असलेला विश्वास दर्शवतो.

काशी–अयोध्याचे ३ स्पेशल रेल्वे टप्पे यशस्वी; ‘जय श्री राम’चा जयघोष! : नोव्हेंबरमध्ये तीन स्पेशल रेल्वे गाड्यांद्वारे आयोजित केलेल्या काशी विश्वेश्वर आणि अयोध्येच्या प्रभू श्रीराम दर्शनाच्या यात्रांचे तीनही टप्पे नुकतेच मोठ्या भक्तिभावात ‘जय श्री राम’ च्या जयघोषात यशस्वीरित्या पूर्ण झाले आहेत. नियोजनबद्ध आयोजन, अखंड सेवा आणि भाविकांच्या सोयीसाठी केलेली उत्तम व्यवस्था यांमुळे साकोरे यांचे कौतुक होत असून, चौथ्या टप्प्याची तयारी सुरू आहे.
या नियोजनबद्ध आयोजनाला शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप विद्याधर कंद, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे आणि यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप , पुणे हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती माजी उपसभापती रविंद्र कंद, माजी उपसभापती ज्ञानेश्वर वाळके, माजी उपसभापती संजीवनी कापरे यांच्यासह अनेक मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या सेवा-समर्पणाच्या माध्यमातून पै. किरण साकोरे यांनी जनतेच्या मनात जो विश्वास निर्माण केला आहे, तो आगामी काळात लोणीकंद-पेरणे गटाच्या विकासाला नवी दिशा देईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
