वाघोली येथे राज्य मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक आढावा बैठक,दिनदर्शिका २०२६ नियोजन,नवनियुक्त पदाधिकारी,सदस्य निवड समारंभास पत्रकारांचा प्रतिसाद
वाघोली (ता. हवेली), दि. १३ डिसेंबर २०२५ पत्रकारांनी पत्रकारितेची प्रतिष्ठा जपत शोध पत्रकारिता वाढवावी आणि कोणताही दबाव न घेता निर्भीडपणे सत्य समाजासमोर मांडावे, असे आवाहन राज्य मराठी पत्रकार परिषदेचे केंद्रीय संस्थापक अध्यक्ष मधुसूदन कुलथे यांनी केले.

वाघोली येथील वृंदावन हॉटेलमध्ये राज्य मराठी पत्रकार परिषदेची वार्षिक आढावा बैठक, दिनदर्शिका २०२६ नियोजन तसेच नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य निवड समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना कुलथे म्हणाले की, पत्रकारिता हे केवळ काम नसून ते एक व्रत आहे. सत्याची बाजू ठामपणे मांडणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. तसेच पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी अत्यावश्यक असलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याचे नोटिफिकेशन राज्य शासनाने तात्काळ काढावे, अशी मागणी त्यांनी केली.यावेळी राज्य मराठी पत्रकार परिषदेत अनेक नवीन पत्रकारांनी अधिकृत सदस्यत्व घेतल्याची माहिती पुणे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर यांनी दिली.

याप्रसंगी राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष प्रविण शिंदे,पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे, पुणे विभागाचे अध्यक्ष नितीन करडे,पुणे विभागाचे उपाध्यक्ष गजानन गव्हाणे ,पुणे विभागाचे कार्याध्यक्ष साहेबराव आव्हाळे,पुणे जिल्हाध्यक्ष सचिन माथेफोड,पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात,पुणे जिल्हा महिला पत्रकार प्रतिनिधी पदमिनी साळुंके,पुणे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन सूंबे,पुणे जिल्हा महासचिव ज्ञानेश्वर पाटेकर,पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शरद टेमगिरे,पुणे जिल्हा सदस्य भाऊसाहेब महाडिक,पुणे जिल्हा महिला प्रतिनिधी उपाध्यक्ष मनीषा पवार,हवेली तालुकाध्यक्ष चंद्रकांत दुंडे,शिरूर तालुकाध्यक्ष एकनाथ थोरात,शिरूर तालुका उपाध्यक्ष शुभम वाकचौरे,शिरूर संपर्क प्रमुख प्रदिप रासकर,जिल्हा सदस्य सिध्दी रामलिंग ढेमरे,नवनिर्वाचित सदस्य रविंद्र कुटे,विक्रम कुटे,सदस्य सुरेश वाळेकर,सदस्या अमृत पठारे,आदी जिल्ह्यातून अनेक नवीन पत्रकार सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजयराव लोखंडे यांनी केले तर सूत्रसंचालन पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय थोरात यांनी केले.तर आभार पुणे विभाग अध्यक्ष नितीन करडे व पुणे जिल्हाध्यक्ष सचिन माथेफोड यांनी मानले.
पत्रकारांसाठी सेवा-सुविधा व पत्रकार भवनासाठी प्रयत्न – पत्रकार हे समाजाचे महत्त्वाचे स्तंभ असून ते अहोरात्र समाजासाठी काम करतात. मात्र, महाराष्ट्रात आजही पत्रकारांना अपेक्षित सेवा व सुविधा मिळत नाहीत. या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शासन स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.
शिरूर–हवेली विधानसभा मतदारसंघात अद्याप पत्रकार भवन उभारले गेले नसल्याने, सर्व पत्रकारांना सोबत घेऊन पत्रकार भवन उभारण्यासाठी पुढील काळात ठोस प्रयत्न करण्यात येणार आहेत. राज्य मराठी पत्रकार परिषद ही संघटना आता महाराष्ट्रभर विस्तारली असून मोठ्या संख्येने पत्रकार सदस्य नोंदणी करत आहेत. : विजयराव लोखंडे, अध्यक्ष (पश्चिम महाराष्ट्र)

