वाडे बोल्हाईत सुरेखा हरगुडे यांच्या तत्परतेने ‘डीपी’चा प्रश्न मार्गी; हजारो नागरिकांना दिलासा

Swarajyatimesnews

अवघ्या दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत; ९० एकर शेतीचे नुकसान टळले

वाडे बोल्हाई (ता. हवेली): येथील भोर वस्तीमधील सुमारे एक ते दीड हजार लोकवस्तीचा गेल्या १५ दिवसांपासून असलेला विजेचा गंभीर प्रश्न कुबेर महिला पतसंस्थेच्या संस्थापक अध्यक्षा व केसनंद ग्राम पंचायत सदस्या सुरेखा रमेश हरगुडे यांच्या प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत सुटला आहे. जळालेली डी.पी. (विद्युत रोहित्र) तातडीने बदलून मिळाल्याने ९० एकर शेतीचे होणारे नुकसान टळले असून, ग्रामस्थांनी हरगुडे यांच्या कार्यतत्परतेचे आभार मानले आहेत.

या कामाबाबत कोलवडीचे माजी उपसरपंच संजय रिकामे, उद्योजक गोरख भोर, लक्ष्मण राठोड, उमेश,बापु भोर ,विशाल भोर,रविंद्र भोर यांनी कौतुक केले.

भोर वस्ती हा प्रामुख्याने शेतकरी आणि दुग्ध व्यावसायिकांचा परिसर आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील मुख्य डी.पी. अचानक जळाली होती. वीज नसल्यामुळे शेतीचे पाणी बंद झाले होते, तर दुग्ध व्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाला होता. घरगुती वीज नसल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यास आणि महिलांना घरकाम करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार पाठपुरावा करूनही तोडगा निघत नसल्याने अखेर नागरिकांनी सुरेखा रमेश हरगुडे यांच्याशी संपर्क साधला.

नागरिकांची समस्या ऐकताच हरगुडे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या (MSCB) वरिष्ठ अधिकाऱ्यांशी तातडीने संपर्क साधला. “शेतकऱ्यांचे पीक जळत आहे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, ही बाब अत्यंत गंभीर आहे,” अशा शब्दांत त्यांनी प्रशासनाकडे आग्रही मागणी केली. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले आणि संबंधित विभागाने अवघ्या दोन दिवसांत नवीन डी.पी. बसवून वीजपुरवठा पूर्ववत केला.

शेतकरी व विद्यार्थ्यांकडून कौतुक : वेळेत वीज मिळाल्याने शेतीला पाणी देता आले, ज्यामुळे अंदाजे १०० एकर क्षेत्रातील पिकांना जीवदान मिळाले आहे. “लोकप्रतिनिधी किंवा सामाजिक कार्यकर्त्याने प्रबळ इच्छाशक्ती दाखवली, तर प्रशासकीय कामे किती वेगाने होऊ शकतात, याचे उत्तम उदाहरण सुरेखा हरगुडे यांनी घालून दिले आहे,” अशा भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

या यशस्वी कामगिरीबद्दल भोर वस्तीतील महिला, शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सुरेखा रमेश हरगुडे यांचा गौरव करत त्यांचे विशेष आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!