पेरणे-लोणीकंदात भाजपचा ‘हायव्होल्टेज’ प्रचार,विकासाच्या मुद्द्यावर किरण साकोरेंची प्रचारात आघाडी !

Swarajyatimesnews

सक्षम उमेदवारांच्या फळीमुळे पेरणे-लोणीकंद गटात कमळ बहरणार; कार्यकर्त्यांच्या उत्साहाने प्रचारात ‘गती’

लोणीकंद (ता. हवेली): पेरणे-लोणीकंद जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने प्रचाराचा धडाका लावत मोठी आघाडी घेतली आहे. उच्चशिक्षित उमेदवार आणि कार्यकर्त्यांचे भक्कम जाळे यांमुळे भाजपचे पारडे जड दिसत असून, “गावचा विकास आणि तरुणांचा विश्वास” हाच मुख्य अजेंडा घेऊन उमेदवार मतदारांच्या भेटीला जात आहेत, अशी माहिती सोमेश्वर पतसंस्थेचे चेअरमन संजयभाऊ कंद यांनी दिली.

प्रचारात भाजपची ‘ट्रिपल इंजिन’ ताकद : या निवडणुकीत भाजपने अतिशय विचारपूर्वक उमेदवारी दिली आहे.

पै. किरण संपत साकोरे (जि.प. गट): एक यशस्वी उद्योजक म्हणून तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे त्यांचे व्हिजन मतदारांना भावत आहे. शेतकरी पुत्र गाडामालक श्रावण बाळ व सर्वसामान्य जनतेच्या हाकेला तातडीने धावणारा आपल्या कुटुंबातील सदस्य अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे अल्पावधीतच केलेल्या सेवाभावी कार्यामुळे मतदारांच्या मनामध्ये चांगलेच स्थान मिळवले आहे

मोनिका श्रीकांत कंद (लोणीकंद गण): अभ्यासू आणि सुशिक्षित चेहरा म्हणून महिला वर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे.

 राणी दत्तात्रय वाळके (पेरणे गण): जनसंपर्क आणि कौटुंबिक वारसा यांच्या जोरावर त्या घराघरांत पोहोचल्या आहेत.

डिजिटल’ आणि ‘थेट संवाद’ यांचा मेळ : केवळ सभा किंवा भाषणांवर न थांबता, हे उमेदवार तांत्रिक युगाची पावले ओळखून युवकांशी संवाद साधत आहेत. पै. किरण साकोरे यांनी तरुणांना ‘नोकरी मागणारे नाही, तर नोकरी देणारे बना’ असा मंत्र दिला असून, कौशल्य विकासावर त्यांनी दिलेला भर चर्चेचा विषय ठरला आहे.

ओबीसी आघाडीचा ‘बळकट’ पाठिंबा : भाजप ओबीसी आघाडीचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष उर्फ भाऊसाहेब झुरूंगे यांनी या तिन्ही उमेदवारांना आपल्या मित्रपरिवारासह जाहीर पाठिंबा दिला आहे. झुरूंगे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार हाती घेतल्याने भाजपची ताकद दुप्पट झाली आहे.

नेत्यांची फळी मैदानात :प्रचाराच्या मोहिमेत माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद, संजय कंद, उपसरपंच अतुल मगर, माजी उपसरपंच चंद्रकांत मगर यांच्यासह मगर, झुरूंगे आणि कंद परिवारातील कार्यकर्ते जीव ओतून काम करत आहेत. “लोकांच्या अडचणींशी असलेली आमची आपुलकी आणि स्थानिक प्रश्नांची सखोल जाण हीच विजयाची गुरुकिल्ली ठरेल,” असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.

 “विकास केवळ कागदावर किंवा भाषणात न राहता तो शेवटच्या माणसाच्या आयुष्यात दिसायला हवा, यासाठीच आमची ही विकास मोहीम आहे.”  — पै. किरण संपत साकोरे (भाजप उमेदवार)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!