Category: सामाजिक
social day to day good or bad events happens everywhere.
धक्कादायक ! स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर बलात्कार
दिनांक २६ फेब्रुवारी पुणे – पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात एका २६ वर्षांच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सदर गुन्ह्याबद्दल दिलेल्या माहितीनुसार ‘पीडित तरुणी स्वारगेट बस स्थानकात बससाठी थांबली होती. त्यावेळी आरोपी तिथे गेला. गोड बोलून त्याने ओळख करुन घेतली. कुठे जाता म्हणून त्याने मुलीला विचारलं. मुलीने…
खेड मधील बहुळ येथे घरावर सशस्त्र दरोडा, दोघांना चाकूने भोकसले घराची फरची रक्ताने लाल
पुणे – बहुळ (ता. खेड) येथे अज्ञात पाच ते सहा दरोडेखोरांनी एका कुटुंबाला चाकू व सुरीचा धाक दाखवून सुमारे सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटली. मात्र घरातील संबंधितांनी प्रतिकार केला असता दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील फरशी रक्ताने माखली होती. दरोडेखोरांच्या हल्ल्यात शालन जयराम वाडेकर…
वाघोलीत टँकरच्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू
वाघोली (ता.हवेली) कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. याप्रकरणी शरद भाकरे यांनी चालक आणि मालकाविरुद्ध पोलिसात कायदेशीर तक्रार दाखल केली आहे राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत…
शिवजयंती निमित्त ‘गडकोट व्याख्यानमाला’ उत्साहात संपन्न
बी जे एस संस्था छत्रपतींच्या स्वराज्य विचारांची पाईक -पांडुरंग बलकवडे दिनांक २० फेब्रुवारी वाघोली ( ता.हवेली) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष व शिवजयंती निमित्त बीजेएस महाविद्यालयातील इतिहास विभाग अंतर्गत हिंदवी स्वराज्याच्या राजधानीची माहिती होण्यासाठी गडकोट वारसा व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. या व्याख्यानमालेचे उद्घाटन बीजेस प्रबंध समितीचे अध्यक्ष अरुणजी नहार, महाविद्यालय विकास…
लग्नावरून परतताना ज्यूस पिण्यासाठी थांबले, भरधाव कारच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू
दोघेजण गंभीर जखमी दि. १६ फेब्रुवारी – गोविंदनगर येथील सदाशिवनगर जॉगिंग ट्रॅकसमोर झालेल्या अपघातात शिक्षिकेचा मृत्यू झाला. गायत्री संदीप ठाकूर (वय ३८) या शिक्षिकेच्या मृत्यूची आणि दोन जणांच्या गंभीर जखमी होण्याची घटना समोर आली आहे. गायत्री ठाकूर आणि सहकारी शिक्षिका नीलम जाचक सोमेश्वर लॉन्सवर एका शाळेतील लग्नाहून परतत असताना ज्यूस पिण्यासाठी स्टॉप केली होत्या. दुपारी…
रस्त्यामध्ये चारचाकी गाडी उभी, वादातून महिलेसह पतीला मारहाण, दगड मारला फेकून
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल रस्त्यामध्ये चारचाकी गाडी लावण्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून तरुणाने एका ३३ वर्षीय महिलेसह तिच्या पतीला, सासू आणि सासरे यांना जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी ५.२५ वाजता घडली. याबाबत हडपसर भागातील मांजरी गावात राहणाऱ्या…
धक्कादायक ! रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू
कार रिक्षाला स्पर्श झाल्यावर सॉरी म्हणाले पण रिक्षा चालकाने पाठलाग करून केली मारहाण बेळगाव – खडेबाजारमधील शिवानंद लॉजजवळ ही धक्कादायक घटना घडली. फोंडा मतदारसंघाचे माजी आमदार, लहू मामलेदार (वय ६९), कामानिमित्त बेळगावला आले असताना, त्यांच्या कारचा रिक्षाला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना सॉरी म्हणत कार घेऊन निघून जाण्याचा निर्णय घेतला. लॉजजवळ कार पार्किंग करत असताना रिक्षाचालकाने…
प्रेरणादायी! दगड फोडणाऱ्याचा पोरगा झाला अधिकारी…
चपरासी झाला तरी चालेल या वडिलांच्या शब्दांनी घडवला सरकारी अधिकारी दगड फोडून आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाह करणारा समाज म्हणून वडार समाज ओळखला जातो. शिक्षण आरोग्य यासारख्या पायाभूत सुविधा या समाजापासून कोसो दूर आहेत. भूमिहीन असल्याने या समाजातील अनेक मुलं दहावी किंवा बारावीपर्यंत शिक्षण घेऊन पोटापाण्याची सोय बघतात.मात्र याच अत्यंत मागास समाजातील मुलाने एमपीएससी परीक्षेचं मैदान मारलं…
बी जे एस महाविद्यालयात क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
३०६ खेळाडूंनी घेतला उस्फूर्तपणे सहभाग वाघोली (ता. हवेली) : भारतीय जैन संघटनेच्या बी जे एस महाविद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव २०२४-२५ हा प्रचंड उत्साहात पार पडला. यावर्षी महाविद्यालयीन प्रांगणात झालेल्या विविध स्पर्धांमध्ये ३०६ खेळाडूंनी सहभाग नोंदवून क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या यशस्वी सहभागामुळे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड व क्रीडा शिक्षक डॉ. रमेश गायकवाड यांनी त्यांना अभिनंदन…
धक्कादायक! वाघोलीत चापट मारल्याच्या रागातून कंटेनर चालकाने दुसऱ्याला चाकाखाली चीरडल्याने जागीच मृत्यू
हॉटेलमधील बिल देण्याचा वाद बेतला जीवावर वाघोली (ता.हवेली) येथे कटकेवाडी परिसरात एका किरकोळ वादातून कंटेनर चालकाने दुसऱ्या चालकाला थेट कंटेनरखाली चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हॉटेलमधील बिल भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपीने राग मनात ठेवून आपला सहकारी चालकाला कंटेनरखाली चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना…
