
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

सर्वसामान्य नागरिकांच्या स्वप्नांना पूर्ण करत त्यांच्या आयुष्यात आर्थिकस्थैर्य आणण्याचे काम कानिफनाथ पतसंस्थेने केले – विठ्ठलराव ढेरंगे
कोरेगाव भिमा (ता. शिरूर) परिसरातील सर्वसामान्य शेतकरी,कामगार व सभासदांच्या अनेक महत्वपूर्ण गरजांना उभे राहत त्यांच्या अनेक स्वप्नांना मूर्त स्वरूप देत त्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्यता आणण्याचे महत्त्वपूर्ण काम कानिफनाथ ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेने केले असून मागील ३५ वर्षांपासून सर्वसामान्य लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली असून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावत असल्याचे प्रतिपादन संस्थापक विठ्ठलराव ढेरंगे यांनी संस्थेच्या ३५ वार्षिक…

धक्कादायक ! वडिलांनी पाय दाबण्यास नकार दिल्याने मुलाने केला वडिलांचा खून
नागपूर – एक धक्कादायक घटना घडली असून मनाला सुन्न करणाऱ्या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. ३३ वर्षीय मुलगा कुशल याने शनिवारी दुपारी वडील दत्तात्रय यांना पाय दाबण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी त्याला नकार दिला. यातूनच चिडलेल्या मुलाने वडिलांना शिवीगाळ करत त्यांना जबर मारहाण केली. दुपारी ४.३० ते संध्याकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. मारहाणीत जखमी…

Wagholi Crime चार महिन्यांपूर्वी लग्न, पत्नी नांदायला येत नाही म्हणून पतीने घेतली फाशी
सासरच्या लोकांवर गुन्हा दाखल लोणीकंद (ता.हवेली) नुकतेच चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरकडच्यांनी अपमानास्पद वागणूक दिल्याने पती रियाज मोमंद मुल्ला (वय २९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. हा प्रकार त्याच्या राहत्या घरी शनिवारी सकाळी घडला. याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय ५४, रा….

पुणे ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न लावणाऱ्याला दंड नाही तर बांधली ‘सुरक्षेची राखी’
अरे दादा तू स्वतः सुरक्षित राहशील तर बहिणीची रक्षा करशील ना ? पुणे पोलिसांच्या सुरक्षिततेचा व्हिडिओ व्हायरल पुणे – सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या व असुरक्षित प्रवास करणाऱ्यांची लक्षणीय वाढली असून ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं…

पुणे, नगर रोड घेणार मोकळा श्वास जंबो फ्लाय ओव्हर उभारत ट्रॅफिक जॅम मुक्त करणार – अजित पवार
सणसवाडी येथील जन सन्मान येत्रेत घोषणा सणसवाडी (ता.शिरूर) लाडक्या बहिणी, लाडके भाऊ ,शेतकरी, मुस्लिम , आदिवासी ते सर्व समाज घटकाला आर्थिक सक्षम करण्यासाठी जी पाऊले उचलली आहेत.ती पुढील पाच वर्षात ही कायम ठेवणार असून पुढील काही दिवसात पुणे नगर रोड वरील वाहतूक कोंडी संपवण्यासाठी जंबो फ्लाय ओव्हर करण्याची गॅरंटी देतो असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार…

वढू बुद्रुक येथील महिला भगिनींनी मानले महाराष्ट्र शासनासह मातोश्री समूहाचे आभार…
मातोश्री उद्योग समूहाने जपली सामाजिक बांधिलकी अनेक महिलांना बँक खाते व माझी लाडकी बहिण योजनेचा महिलांना मोठा लाभ वढू (ता. शिरूर) येथील मातोश्री उद्योग समूहाच्या वतीने १०० हुन अधिक महिला भगिनिंना एअरटेल पेमेंटस बॅंक खाते काढून देण्यात आले. त्यासोबत डीबीटी लिन्क करुन मुख्यमंञी लाडकी बहीण योजनाचे फॉर्म भरुन देण्यात आला होता व त्याचे पैसे नुकतेच…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शिरूर तालुक्यातील जन सन्मान यात्रेची जय्यत तय्यारी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभेकडे विधानसभेच्या पार्श्याभूमीवर अनेकांचे लक्ष तर कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथे राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची माझी लाडकी बहिण योजना जन सन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस,भाजप, शिवसेना व महायुतीचे सह पक्ष यांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची…

जे जे इंटरनेशनल स्कूल च्या निल मैड ची राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी निवड
करंदी (ता. शिरूर) येथील जे जे इंटरनेशनल स्कूलचा विध्यार्थी निल प्रशांत मैड याची चौदा वर्षीय राज्यस्तरीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी पुणे ग्रामीण संघामधुन निवड झाली आहे. टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र व टेनिस क्रिकेट असोसिएशन पुणे ग्रामीण यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्ट रोजी अंथरणे ता. इंदापूर येथे टेनिस क्रिकेट जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आली होती. या…
पिंपळे जगताप येथे ग्राम पंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण…
गावासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान एच श्र संस्कृतीचे पूजन आणि वंदन – सरपंच सोनल अशोक नाईकनवरे पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवत कर्मचाऱ्यांच्या सेवेचा व त्यागाचा अनोखा सन्मान केला. पिंपळे जगताप ग्राम पंचायतीच्या सरपंच सोनल अशोक नाईकनवरे यांनी…

जीव देण्यापूर्वी आई वडिलांचे शेवटचे शब्द आमची मुले आजीकडे राहतील आमचा कोणावरही विश्वास नाही
कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या ज्वेलरने पत्नीसह गंगा नदीत घेतली उडी : आत्महत्येपूर्वी घेतला सेल्फी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एका ज्वेलर शॉपच्या मालकाने पत्नीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर यांनी पत्नीसोबत हरिद्वारच्या गंगा नदीत उडी मारून आपले जीवन संपवले.सौरभ यांच्या चिठ्ठीत मध्ये आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे…