
Category: ताज्या बातम्या
Here in this we are posting all the daily activities happen time to time.

चाकणमध्ये भीषण अपघात गर्भवती महिलेचा मृत्यू, चालकासह दोघे गंभीर जखमी
चाकण येथील बिरदवडी फाटा ते पुणे-नाशिक महामार्गावर मंगळवारी (दि. २४) मोटार कार आणि पिकअप जीपच्या समोरासमोर धडकेत एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे, तर चालकासह दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव हर्षदा केतन खानेकर (वय २७, सध्या रा. भायखळा, मुंबई, मूळ रा. नारायणगाव, जुन्नर) असे आहे. या प्रकरणी मोटार कार…

धक्कादायक! शिक्रापूर येथे अवघ्या तीन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार
पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला तत्काळ अटक शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे, हा बलात्कार करणारा १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन मुलगा असून याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर…

शिक्रापूर पोलिसांची धडक कारवाई: ३ आरोपींकडून २ गावठी पिस्टल व २ जिवंत काडतुसे जप्त
शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील खुनाच्या गुन्ह्यातील जामिनावर सुटलेल्या आरोपी चेतन शिंदे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. त्यांच्या जवळून २ गावठी पिस्टल आणि २ जिवंत काडतुसे असा एकूण १.०१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही…

वाघोलीत आरएमसी मिक्सरची ट्रकची स्कूल बसला धडक
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली, पण अपघातांचे सत्र कायम वाघोली (ता. हवेली) येथील वाघोली-लोहगाव रस्त्यावर बुधवारी सकाळी साडेसात वाजता झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा या भागातील अपघातांच्या सत्राला वाचा फोडली आहे. आरएमसी मिक्सर ट्रकने (काँक्रीट मिक्सर) स्कूल बसला धडक दिली, ज्यामध्ये शाळकरी मुलांचे जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही, मात्र…

महाविद्यालयाला अनुदान मिळवण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांसह जाई खामकरांचे आमरण उपोषण
शिरुर: टाकली हाजी (ता.शिरूर) येथील मळगंगा अंध अपंग सेवा संस्थेचे न्यू व्हिजन कला, वाणिज्य महाविद्यालय (निवासी अंध अपंग) यास अनुदान मिळवून देण्यासाठी संस्थापक अध्यक्षा जाई खामकर २६ सप्टेंबर २०२४ रोजी आझाद मैदान, मुंबई येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसह आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. जाई खामकर यांनी सांगितले की, हे महाविद्यालय महाराष्ट्रातील एकमेव दिव्यांगांसाठी…

सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय..
ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम विकास) राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले असून राज्यातील सरपंच व उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे.तर ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी पद (ग्राम…

पुण्याच्या प्रसिद्ध उद्योगपतीचा निर्घृण खून; पत्नी जखमी
चाकू, लोखंडी रॉडसह तलवारीने हल्ला पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती विनायक काशिनाथ नाईक (वय ५२) यांचा रविवारी पहाटे कारवार तालुक्यातील हाणकोण येथे पाच ते सहा मारेकऱ्यांनी निर्घृण खून केला. चाकू, लोखंडी रॉड आणि तलवारींच्या सहाय्याने झालेल्या या हल्ल्यात नाईक यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी वृषाली नाईक या हल्ल्यात जखमी झाल्या आहेत. विनायक नाईक हे सातेरी देवीच्या…

पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी व्यक्त केली नाराजी ,पुणे पोलिसांना पत्र
पुण्यातील खड्ड्यांमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही नाराज असल्याचं पुढं आलं असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुण्यात २ आणि ३ सप्टेंबरला पुण्यात आल्या होत्या. राष्ट्रपती पुण्यात येणार असल्याने पुणे महानगर पालिकेने रस्त्यांची डागडुजी केली मात्र, ती चुकीच्या पद्धतीने केली. त्यामुळे या खड्ड्यांबाबत राष्ट्रपती कार्यालयाने पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. दरम्यान, २६ तारखेला पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी…

वडगाव शेरीमध्ये मिरवणुकीत हाय टेन्शन वायरला झेंड्याचा रॉड लागल्याने वीजेचा धक्क्याने एका युवकाचा मृत्यु, तिघे जखमी
चंदननगर – मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता.तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला…

खेड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक संदीप पर्वते यांचे ऑन ड्युटी हृदयविकाराने निधन
पुणे – खेड पोलिस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक संदीप गोरक्ष पर्वते (वय ३५) यांचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. मुळगाव अकलूज, सोलापूर येथील रहिवासी असलेल्या पर्वते यांची काही महिन्यांपूर्वीच खेड येथे बदली झाली होती. सकाळी कामावर आल्यावर अचानक त्यांना झटका आला आणि तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला….