
शिरूर तालुक्यात जेवायला वाढले नाही म्हणून सासऱ्याची सुनेला काठीने मारहाण
शिरूर तालुक्यातील गुनाट गावात एका सासऱ्याने आपल्या सुनेला मारहाण केल्याची घटना घडली आहे. मंगल बाळू बुलाखे (वय ४५) यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मंगल या घराच्या ओट्यावर जेवण करत असताना त्यांचे सासरे नामदेव यशवंत बुलाखे हे दारूच्या नशेत घरी आले. त्यांनी मंगल यांना जेवण वाढण्यास सांगितले. त्यावेळी मंगल यांनी “थांबा, मी…