
Category: स्थानिक वार्ता

काळाचा घाला! आई-वडिलांविना कष्टातून आयुष्य फुलवले, पण हृदयविकाराने प्रदीप ढेरंगेंना हिरावले
कोरेगाव भीमावर शोककळा, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर कोरेगाव भिमा (ता. शिरूर): आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर संघर्षाला सामोरे जाऊन, मोठ्या हिमतीने स्वतःचा संसार आणि शेती फुलवलेल्या कोरेगाव भीमा येथील मनमिळावू, कष्टकरी आणि हसतमुख प्रगतशील शेतकरी प्रदीप ढेरंगे (वय अंदाजे ४०-४५ वर्षे) यांचे मध्यरात्री ३ वाजता आलेल्या हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. या धक्कादायक बातमीने कोरेगाव भीमा आणि पंचक्रोशीवर…

जुन्नरच्या दुर्गावाडी दरीत तलाठी आणि युवतीचा आढळला मृतदेह
जुन्नर (जिल्हा पुणे): जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या दुर्गावाडी येथील कोकणकड्याच्या सुमारे १२०० फूट खोल दरीत एक तलाठी आणि एका महाविद्यालयीन युवतीचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जुन्नरचे पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी या घटनेची माहिती दिली. मृत व्यक्तींची ओळख आणि बेपत्ता होण्याच्या तक्रारी – मृतांमध्ये रामचंद्र साहेबराव पारधी (वय ४०), मूळ गाव…

पॅकोलाइन कंपनीकडून वारकऱ्यांना फराळाचे वाटप: माणुसकीच्या सेवेचा आदर्श!
हडपसर (ता. हवेली): अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल परमात्म्याच्या वारी सोहळ्यात हडपसर येथे एक माणुसकी आणि भक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करत, पॅकोलाइन इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने फराळाचे वाटप केले. कंपनीचे मालक बाझील शेख आणि एचआर राजीव नायर यांच्या वतीने…

शेतकऱ्याची ‘कारभारीण’ – आधुनिक महाराष्ट्राची खरी हिरोईन!
शेतकऱ्याची कारभारीण: संस्कृती, समर्पण, स्वावलंबन आणि स्त्रीशक्तीचा गौरव! मातीत जन्मलेली, संस्कृतीने घडलेली, कुटुंबाला आधार देणारी, आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वतःचा मार्ग घडवणारी – ही आहे शेतकऱ्याची ‘कारभारीण’. शहरी झगमगाटात हरवून न जाता, आपल्या ग्रामीण संस्कृतीशी नाळ जोडून, स्वतःच्या कष्टाने आणि बुद्धीने एक नवा आदर्श निर्माण करणारी ही शेतकऱ्याची पत्नी म्हणजे खऱ्या अर्थाने असामान्य स्त्रीशक्तीचे प्रतीक! ती…

वाडेबोल्हाईत एसटी आणि कारचा भीषण अपघात
दुचाकीस्वाराला वाचवताना दोन्ही वाहने खड्ड्यात, सुदैवाने जीवितहानी टळली वाडेबोल्हाई, (ता. हवेली): वाघोली-राहू रस्त्यावर वाडेफाटा नजीक शुक्रवारी सकाळी ९:३० च्या सुमारास एसटी बस आणि एका चारचाकी कारचा भीषण अपघात झाला. एका दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही वाहने रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शुक्रवार दिनांक २२…

पुणे: वाघोलीच्या मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगवर १० वर्षांची बंदीची शिफारस; उत्तरपत्रिका गैरप्रकार प्रकरण
पुणे: वाघोली येथील पार्वतीबाई गेनबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये परीक्षा गैरप्रकाराचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा संपल्यानंतर रात्रीच्या अंधारात पुन्हा उत्तरपत्रिका लिहिल्याचा गंभीर आरोप या कॉलेजवर आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, कॉलेजवर १० वर्षांसाठी परीक्षा केंद्र बंद ठेवण्यासह कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. या घटनेमुळे…

कोरेगाव भिमा – पेरणे बंधारा की वॉल गेली वाहून, नंतर पाहणी करण्यासाठी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले धावून
शेतकऱ्यांचे डोळे पाणावले, पण अधिकाऱ्यांचे डोळे पाहणीतच रमले, पाटबंधारे खात्याच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह ??? कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता.हवेली) येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात ढापे न काढल्याने व वेळेत योग्य ती दुरुस्ती न झाल्याने फुटून गेला. सदर बंधारा फुटल्याने अधिकाऱ्यांनी कोरेगाव भिमा सकाळी सकाळी भेट देत पाहणीची कार्यतत्परता दाखवली…

शिरूर तालुक्यातील शेतकरी पुत्र प्रथमेश मलगुंडेची पहिल्याच प्रयत्नात ‘इंडियन नेव्ही’त सब लेफ्टनंट पदी निवड
ढोक सांगवी (ता.शिरूर) येथील शेतकऱ्याचा मुलगा, ग्रामीण शाळेतून मिळालेले शिक्षण आणि मनात देशसेवेची जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य विचाराची प्रेरणा या त्रिसूत्रीच्या बळावर शिरूर तालुक्याच्या प्रथमेश मलगुंडेने पहिल्याच प्रयत्नात भारतीय नौदलात (Indian Navy) ‘सब लेफ्टनंट’ पदाला गवसणी घातली आहे! हे यश केवळ प्रथमेशचे नाही, तर ग्रामीण भागातील संघर्ष करत स्वतःल सिद्ध करू पाहणाऱ्या प्रत्येक…

”पाटबंधारे विभागाचा गलथान कारभार’! कोरेगाव भिमा – पेरणे येथील भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटला
कोल्हापूर पद्धतीचा बंधारा फुटल्याने १७८३ हेक्टर शेतजमीन,अनेक गावांच्या पाणी पुरवठा योजना यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता तर ग्रामस्थांकडून तातडीने नवीन बंधारा बांधण्याची मागणी दिनांक २० जून २०२५ कोरेगाव भीमा (ता. शिरूर): शिरूर आणि हवेली तालुक्यांसाठी जीवनवाहिनी ठरलेल्या भीमा नदीवरील, कोरेगाव भीमा (ता. शिरूर) आणि पेरणे (ता. हवेली) दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा महत्त्वाचा बंधारा अखेर फुटला आहे!…

डिंग्रजवाडी येथे विद्यार्थ्यांचे फेटे बांधून ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत
डिंग्रजवाडी (ता. शिरूर):जि. प. प्राथमिक शाळा डिंग्रजवाडी येथे शैक्षणिक वर्ष 2025–26 चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या पहिलीतील विद्यार्थ्यांसह इयत्ता पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांचे गावातून मिरवणूक काढत, ढोल-ताशांच्या गजरात, फेटे बांधून आणि सजवलेल्या ट्रॉलीतून स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशांचे मोफत वाटप करण्यात आले….