
Category: स्थानिक वार्ता

सरपंच संदीप ढेरंगे यांच्यामुळे कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीत पोहोचल्याचा अभिमान – उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले
कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमाचे (ता. शिरूर) सरपंच संदीप ढेरंगे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहणासाठी विशेष निमंत्रण मिळाल्याने कोरेगाव भीमाचे नाव दिल्लीपर्यंत पोहोचले आहे. सरपंच ढेरंगे यांच्या विकासकामांची दखल थेट दिल्लीत घेतली गेल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी काढले. या निमंत्रणाबद्दल बोलताना प्रशांत ढोले म्हणाले,…

मुंबईतील ‘मराठा’ बांधवांना कोरेगाव भीमाचा आधार: लोणचे,चटण्या,बिस्किटे ,पाणी बॉटल्ससह चपात्या पाठवल्या एक हजार
पुणे – मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांसाठी शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा ( ता.शिरूर) येथील अखिल म्हसोबा नगर गणेश मित्र मंडळ, जय जिजाऊ महिला ग्रामसंघ, ढेरंगे वस्ती येथील बांधवांनी व महिला भगिनींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेत मदतीचा मायेचा हात दिला आहे. आंदोलक बांधवांना जेवण आणि पाणी कमी पडू…

कौशल्य विकास ही उद्योगांची गरज असून विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी आहे – प्रल्हाद वारघडे
पुणे: आजच्या स्पर्धात्मक जगात, केवळ पारंपरिक पदवी शिक्षण पुरेसे नाही. उद्योग क्षेत्राच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी कौशल्य विकास (Skill Development) ही सर्वात मोठी गरज बनली आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि नोकरी शोधणाऱ्यांसाठी यशस्वी करिअरचा मार्ग तीन स्तंभांवर आधारित आहे: प्रात्यक्षिक ज्ञान, तांत्रिक प्राविण्य आणि व्यक्तिमत्त्व विकास. उद्योग क्षेत्रातील बदल आणि भविष्यातील रोजगार संधी – तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे उद्योग…

माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्थेत अन्नदान
सणसवाडी (ता.शिरूर) येथे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत व एक विधायक समाजोपयोगी उपक्रम राबवत माहेर संस्थेतील मनोरुग्ण ,वृद्ध,महिला व बालकांना अन्नदान करण्यात आले. माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सणसवाडी येथील माजी आमदार अशोक पवार यांचे जिवाभावाचे निष्ठावान समर्थक माजी पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पंडित दरेकर व मित्र परिवाराने सामाजिक…

शिक्रापूरमध्ये रेकॉर्डवरील आरोपीचा पोलिसांवर गुप्तीने हल्ला दोन पोलिस जखमी तर प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आरोपीचा मृत्यू
शिक्रापूर (ता. शिरूर): येथील मलठण फाट्यावर आज (दिनांक ३० ऑगस्ट) सायंकाळी ६ वाजता एक थरारक घटना घडली. सातारा पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात घरफोडीचा आरोपी लखन भोसले (वय २५, रा. खटाव, जि. सातारा) याने त्याला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गुप्तीने हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सातारा पोलिसांना हवा असलेला…

टाकळी हाजीच्या शिक्षकांचा अनोखा विक्रम: एकाचवेळी सहा शिक्षक मुख्याध्यापकपदी विराजमान
टाकळी हाजी (प्रतिनिधी): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी या छोट्या गावातील सहा आदर्श शिक्षकांना नुकतीच पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मुख्याध्यापकपदी पदोन्नती मिळाली आहे. या ऐतिहासिक यशामुळे संपूर्ण शिरूर तालुक्याचा शैक्षणिक मान उंचावला असून, शिक्षकांच्या कठोर परिश्रमाचे आणि निस्सीम योगदानाचे हे प्रतीक आहे. शिक्षकांनी आपल्या कर्तृत्वाने ग्रामीण भागातील शिक्षणाचा दर्जा केवळ वाढवला नाही, तर विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,…

राष्ट्रीय परिवर्तक परिषदेसाठी मंगेश पोळ यांची निवड
माहेरच्या प्रेमाची आणि सेवेची गाथा २५ सप्टेंबर, पुणे: प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, सामाजिक शांतता आणि मानवतेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या मंगेश पोळ याची गुजराथमधील राष्ट्रीय परिवर्तक परिषद २०२५ साठी निवड झाली आहे. भारतभरातील केवळ ५० निवडक व्यक्तींमध्ये मंगेशचा समावेश झाल्याने त्याचे हे यश विशेष कौतुकास्पद ठरले आहे. आईने जीवावर उदार होऊन माहेर या संस्थेमध्ये दाखल…

गणेशोत्सवासाठी पुण्यात ‘गणेश दर्शन सहली’ चे आयोजन
पुणे, दि. २८ ऑगस्ट पुणे: यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पर्यटन संचालनालय, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. आणि पुणे महानगरपालिका यांनी मिळून देशी-विदेशी पर्यटकांसाठी विशेष ‘गणेश दर्शन सहल’ आयोजित केली आहे. या सहलीमध्ये पुण्यातील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या थेट दर्शनाची सोय करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत १ सप्टेंबर रोजी ६० वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिक…

पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदाचा युवराज पाटील यांनी स्वीकारला पदभार
दि. २ऑगस्ट : पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून युवराज पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. यावेळी माहिती अधिकारी सचिन गाढवे यांनी त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी यापूर्वी सहायक संचालक मंत्रालय, सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय,पुणे तर अकोला, वाशिम,सातारा,लातूर आणि जळगाव येथे जिल्हा माहिती अधिकारी या पदावर काम केले आहे.यावेळी जिल्हा माहिती कार्यालयातील …

सणसवाडीतील (वसेवाडी) जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थिनींनी साकारली श्री गणेशाची अद्भुत कलाकृती
सणसवाडी (ता. शिरूर): वसेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुलींनी आपल्या कल्पकतेच्या जोरावर बुद्धीची देवता श्री गणेशाची सुंदर कलाकृती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमात तब्बल २१५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. गणेशोत्सवाच्या पावन पार्श्वभूमीवर साकारलेली ही कलाकृती समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ तिचं कौतुक करत आहेत. गणेशमूर्तीचे प्रत्येक अंग मुलांनी बारकाईने…