
लोणीकंद शाळेत स्वातंत्र्यदिनी गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा सन्मान
पुणे – स्वातंत्र्यदिनाच्या मंगलदिनी, १५ ऑगस्ट २०२५ रोजी, पी.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, लोणीकंद (ता. हवेली) येथे एक भव्य कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात प्रभातफेरी, ध्वजारोहण, संचलन, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. याचसोबत, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना गौरवण्यात आले. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्ञानप्रबोधिनी, नवोदय, आणि शिष्यवृत्ती…