Swarajyatimesnews

वढू बुद्रुक ते चौफुला रस्त्यावरील पूल गेला वाहून.. घर, गोठ्यामध्ये शिरले पाणी..शेतीचेही नुकसान 

सरकारी काम आणि सहा महिने थांब.. जोरदार आला पाऊस गेला पूल (भराव) वाहून.. कोरेगाव भिमा (ता.शिरूर) श्री क्षेत्र वढू बुद्रुक – चौफुला रस्त्याचे काम मागील अनेक दिवसांपासून बंद असून येथील ओढ्यावरील (पूल) मुरुमाचा भराव पावसाच्या पाण्यात वाहून शेतकऱ्यांच्या गोठ्यात आणि घरात पाणी शिरले तर वढू बुद्रुक ते चौफुला अशी वाहतूक ठप्प झाली असून याला बांधकाम…

Read More
Swarajyatimesnews

कोरेगाव भीमा येथे क्षणात माकडाच कुटुंब उध्वस्त करणारी शोकांतिका, ती गेली… पिल्लूही गेलं… पण तो अजूनही थांबलेला, कोरड्या डोळ्यातील वेदना हृदयाला भिडणारी..

शब्दात नव्हे तर कृतीत जगणारी, माणुसकी ,प्रेम शिकवणारी अबोल निष्ठावान प्रेमाची हृदयस्पर्शी वेदना कोरेगाव भीमा (ता.शिरूर) आदर्श चौकात एक हृदयस्पर्शी दुर्घटना घडल्याने माणसांचे मन प्रेमाने ओथंबून जाते आणि नकळत डोळे पाणावतात,“ती माकडीण गेली… तिचं छोटंसं पिल्लूही गेलं… पण त्या दोघांच्या मृतदेहाजवळ, अजूनही थांबून आहे एक माकड — न हलणारं, न काही खाणारं, फक्त त्यांच्याकडे पाहणारं….

Read More
Swarajyatimesnews

शिरूरच्या  शिंदोडी मातीचोरी प्रकरणी शेतकऱ्यांनी केली तहसीलदारांची तक्रार थेट महसूल मंत्र्यांकडे 

शिरूर (ता. शिरूर) – शिरूर तालुक्यातील तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या मनमानी कारभाराविरोधात स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर राजे उमाजी नाईक महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत शितोळे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन तहसीलदारांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली. दौलत शितोळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्र्यांना तहसीलदारांवरील आरोपांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये अवैध धंद्यांना पाठीशी…

Read More
Swarajyatimesnews

धक्कादायक! वाडा पुनर्वसन येथे “दररोज ५०० रुपये देतो, घरामागे एक तास येत जा” म्हणत ४२ वर्षीय इसमाने केला तरुणीचा विनयभंग

पोलिसांनी आरोपीस ठोकल्या बेड्या… वाडा पुनर्वसन  (ता. शिरूर) :येथे महाविद्यालयात शिकणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याप्रकरणी ४२ वर्षीय इसमाला शिक्रापूर पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. या प्रकारामुळे तरुणी आणि तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. शिक्रापूर पोलिस ठाण्यात तरुणीने फिर्याद दाखल केली असून त्यानुसार मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुणी ही आपल्या कुटुंबासह वाडा पुनर्वसन येथे राहते व…

Read More
Swarajyatimesnews

थेऊर फाटा येथे अपघातात माळकऱ्याचा मृत्यू; पिशवीत सापडले 2.40 लाख रुपये

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर थेऊर फाटा येथे बुधवारी (ता. 21) पहाटे एका अनोळखी माळकऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. तो रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना कुंजीरवाडी (ता. हवेली) हद्दीत बँक ऑफ बडोदा समोर घडली. मृत व्यक्ती लोणी काळभोर परिसरात नागरिकांकडून भिक्षा मागत असल्याचे सांगण्यात येते.घटनास्थळी लोणी काळभोर पोलिस…

Read More
Swarajyatimesnews

सणसवाडीत कोसळले अवाढव्य होर्डिंग; सुदैवाने जीवितहानी टळली, वाहतूक ठप्प

सणसवाडी (ता. शिरूर), ता. २० मे : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील सणसवाडी मुख्य चौकात मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यामुळे एक मोठे होर्डिंग कोसळले. सुमारे ३० फूट लांब, ३० फूट रुंद व ३० फूट उंचीचे हे अवाढव्य होर्डिंग महामार्गाच्या दिशेने कोसळले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने, होर्डिंगच्या खाली असलेल्या दुकानांतील नागरिक वेळेवर…

Read More
Swarajyatimesnews

शिक्रापूर येथील विद्याधाम प्रशालेत ३५ वर्षांनी भरला स्नेहमेळावा

शिक्रापूर (ता.शिरूर) : विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर येथील सन १९९०- ९१ च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा तब्बल ३५ वर्षांनंतर मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या वेळी जुन्या वर्गमित्रांना भेटून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत आयुष्यात केलेल्या प्रगती, सुखदुःखाची, आशापयश यांची उजळणी करण्यात आली.  या कार्यक्रमास शाळेचे जेष्ठ मार्गदर्शक गुरुजन बांगर सर, साकोरे सर, सूर्यकांत शिर्के सर,…

Read More
Swarajyatimesnews

लोणंद येथे होणार संत ज्ञानेश्वर माऊली व कान्हुराज महाराज यांच्या पालखीचा ‘काका-पुतणे भेट सोहळा’

कोरेगाव भिमा (ता. शिरूर) – यावर्षीपासून लोणंद (जि. सातारा) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत कान्हुराज पाठक महाराज यांच्या पालख्यांची अधिकृत ‘काका-पुतणे भेट’ होणार असून, हा भक्तिरसात न्हालेला सोहळा येत्या २७ जून रोजी पार पडणार आहे. या ऐतिहासिक निर्णयाने वारकरी संप्रदायात आनंदाची लहर उमटली आहे. साडेसातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या संजीवन समाधीवेळी खिरापतीचे कीर्तन…

Read More
Searajyatimesnews

कोरेगाव भीमा येथील लॉजमध्ये शिक्रापूरच्या तरुणाची आत्महत्या

कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील एका लॉजमध्ये अमोल शिवाजी आढाव (वय २९, रा. २४ वा मैल, शिक्रापूर) या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता. १७ मे) सकाळी उघडकीस आली असून आत्महत्येच्या कारणाचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.  शुक्रवारी (ता.१६ मे) कोरेगाव भीमा येथील हॉटेल जनता लॉजमध्ये थांबलेला होता. शनिवारी सकाळी त्याच्या खोलीचा दरवाजा…

Read More
swarajyatimesnews

मांडवगण फराटा येथे डंपर-पिकअप अपघात; दोन ठार, एक गंभीर जखमी

मांडवगण फराटा (ता.शिरूर) गावात डंपर आणि पिकअप जीपमध्ये झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात १७ मे रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडला. प्राप्त माहितीनुसार, मांडवगण फराटा येथून वडगाव रासाईकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने (MH 42 SEQ 7696) समोरून येणाऱ्या पिकअप जीपला (MH 03 OE 0638)…

Read More
error: Content is protected !!