
Category: स्थानिक वार्ता

कोरेगाव भीमा: २५ वर्षांनी भरला स्नेहसंमेलनाचा वर्ग! आठवला बालपणीचा स्वर्ग, बहरला आठवणींचा स्मृतीगंध’!
“हे दिवस पुन्हा येणार का?” – छत्रपती संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची हृदयस्पर्शी भेट कोरेगाव भीमा (ता. शिरूर):शाळा म्हणजे केवळ विटा-मातीची इमारत नसते; ती असते जिथे आयुष्यभराची संस्काराची शिदोरी मिळते, जी सरतही नाही आणि उरतही नाही. जिथे निरपेक्ष मैत्री जन्मते, आभाळाला ठेंगणं करणारी स्वप्नं रुजतात आणि चिमण्या पाखरांना बळ देत ध्येयाच्या शिखरावर झेप घेतात. आणि एक दिवस…

आदर्श सरपंच रमेश गडदे यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा
वढू बुद्रुक (ता. शिरूर) “सामाजिक कार्य हीच खरी सेवा” हे ब्रीदवाक्य अंगीकारून शिक्रापूर ग्रामनगरीचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी आपला वाढदिवस वंचित आणि उपेक्षित घटकांप्रती कळवळा दाखवत, वढू बुद्रुक येथील माहेर सामाजिक संस्थेत उत्साहात साजरा केला. त्यांच्या या कृतीने त्यांनी केवळ एक दिवस नव्हे, तर आयुष्यभर समाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. राजकारणी नव्हे, समाजाच्या…

वाघोलीतील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परीक्षेचे पेपर रात्री लिहिण्यास देणाऱ्या प्राध्यापकासह तीन विद्यार्थ्यांना अटक
दोन लाख रुपयांसह महत्त्वाचा मुद्देमाल जप्त; ८ विद्यार्थ्यांचीही ओळख पटली पुण्यातील वाघोली येथे असलेल्या पार्वतीबाई गेणबा मोझे अभियांत्रिकी कॉलेजमध्ये परिक्षेतील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कॉलेजमध्ये दिवसा झालेला परिक्षेचा पेपर रात्री उशिरा पुन्हा लिहून घेतला जात होता. पुणे गुन्हे शाखेने छापा टाकून कॉलेजच्या एका प्राध्यापकासह चार जणांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये…

गुंठामंत्री संस्कृती: वैष्णवीचा मृत्यू की सामाजिक नैतिक अधःपतन?
गुंठामंत्री संस्कृती’ हा शब्द आज केवळ जमिनीच्या मोजमापापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो आपल्या समाजातील संवेदनशीलता, माणुसकी आणि मूल्यांच्या घसरणीचे प्रतीक बनला आहे. एकेकाळी कुटुंबाला आधार देणारी, नात्यांना महत्त्व देणारी समाज रचना आज झगमगाटाच्या दुनियेत हरवून गेली आहे. अचानक आलेल्या श्रीमंतीने भौतिक सुखांचा ढीग दिला असला, तरी नात्यांमध्ये मात्र काळोख साठू लागला आहे. उद्योगनगरी ते…

दुर्दैवी! चाकणच्या कडाचीवाडी येथे पाझर तलावात बुडून चार शाळकरी मुलांचा मृत्यू
चाकण (ता.खेड) कडाचीवाडी येथे सकाळी घरातून खेळण्यासाठी बाहेर गेलेली मुले घरी आली नसल्याने शोधाशोध सुरू करण्यात आली. यावेळी पाझर तलावा जवळ चारही जणांचे कपडे आणि चप्पल आढळून आल्याने चिंता वाढली, स्थानिक नागरिकांच्या मदतीने तलावात शोध घेण्यात आला आणि चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चाकण येथील कडाचीवाडी (ता.खेड ) येथील पाझर…

JSPM च्या विद्यार्थ्यांनी AI वर आधारित शेतीसाठी बनवले क्रांतिकारी अॅप
अॅपद्वारे शेतकऱ्यांना हवामान अंदाज, माती परीक्षण, उत्पादन खर्चाचे मूल्यांकन, तसेच आधुनिक शेतीत वापरण्यात येणाऱ्या पद्धतींबाबत मिळणार माहिती पुणे – जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च (BSIOTR), वाघोली येथील संगणक अभियांत्रिकी विभागाच्या अंतिम वर्षातील चार विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी AI-ML आधारित अॅप तयार केले आहे. श्रीहर्ष देशमुख, अमन कुमार, अनिश बनसोडे आणि प्रितेश बिरादार यांनी तयार…

दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याने चाकूने नऊ वार
रस्त्यात दुचाकी आडवी लावलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावरून युवकावर चाकूने नऊ वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना भोसरीतील मोहननगर येथे घडली. याप्रकरणी तबवायजुल हक्क अन्सारी (वय ३४, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तबरेज आणि त्यांचे…

महावितरणला पावसाचा फटका; ९२४ वीज खांब पडले
वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर २७ मे – मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांमधील ९२४ वीज खांब जमीनदोस्त झाले. यामध्ये ६५७ लघुदाब व २६७ उच्चदाब खांबांचा समावेश आहे. पावसामुळे बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर या तालुक्यांतील वीजपुरवठ्यावर परिणाम झाला होता. बारामती विभागातील लोणी देवकर, भिगवण, सणसर, काळेवाडी आणि केडगाव…

हवेली तहसीलदारांचा धडाकेबाज ‘सर्जिकल स्ट्राइक’; डंपरवाल्यांची पळापळ
फक्त ७ वाहनांकडेच पास! लोणीकंद (ता.हवेली) येथील सुरभी चौकात तहसीलदार तृप्ती कोलते यांच्या नेतृत्वाखाली अवैध वाहतुकीवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत १६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी फक्त ७ वाहनचालकांकडे वैध वाहतूक पास आढळले. या कारवाईदरम्यान एका वाहनचालकाने गाडी पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याचे फोटो आणि व्हिडीओ घेत गाडी जप्त केली….

सणसवाडीमध्ये मुसळधार पावसामुळे मयुरी रेसिडेन्सी सोसायटीची भिंत कोसळली
सणसवाडी (ता. शिरूर) – सततच्या जोरदार पावसामुळे सणसवाडी येथील मयुरी रेसिडेन्सी सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली. या घटनेमुळे सोसायटीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, महसूल विभागाने तातडीने पंचनामा करावा अशी मागणी सोसायटीच्या चेअरमन वंदना दरेकर यांच्यासह रहिवाशांनी केली. या संदर्भात माहिती देताना सोसायटीच्या चेअरमन वंदना पंडित दरेकर यांनी सांगितले की, सणसवाडी परिसरात मुसळधार पावसामुळे नागरी वस्ती,…